Next
सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनतर्फे स्त्रीशक्ती पुरस्कारांचे वितरण
BOI
Friday, October 19 | 12:51 PM
15 0 0
Share this story

सूर्यदत्ता स्त्रीशक्ती पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी  पुरस्कारार्थींसह डॉ. दत्ता कोहिनकर, डॉ. मुक्ता पुणतांबेकर, सचिन इटकर, डॉ. संजय चोरडिया आदी मान्यवर

पुणे : ‘सर्व क्षेत्रात काम करण्याची क्षमता महिलांमध्ये आहे. राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, आयर्न लेडी इंदिरा गांधी आणि अशा असंख्य महिलांनी देशाला महान सुपुत्र दिले. त्यांच्यावर संस्कार केले. भारतीय संस्कृती अबाधित ठेवण्यात महिला नेहमीच अग्रस्थानी राहिल्या आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आपण केला पाहिजे’, असे मत विश्वशक्ती इंटरनॅशनल सेंटरचे प्रमुख विश्वस्त डॉ. दत्ता कोहिनकर यांनी व्यक्त केले.

सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे नवरात्र उत्सवानिमित्त दिल्या जाणाऱ्या ‘सूर्यदत्ता स्त्रीशक्ती पुरस्कार’ वितरणप्रसंगी ते बोलत होते. बावधन येथील सूर्यदत्ता एज्युकेशनच्या कॅम्पसमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला  स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे वरिष्ठ सल्लागार सचिन ईटकर, सूर्यदत्ता ग्रुपच्या उपाध्यक्षा डॉ. सुषमा चोरडिया, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनुजा देशमाने, सूर्यदत्ता एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे संचालक शैलेंद्र कासंडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य, पत्रकारिता, महिला सक्षमीकरण आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नऊ महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये आबेदा इनामदार (शिक्षण), सरिताबेन राठी (अध्यात्मिक), मुक्ता पुणतांबेकर (समाजसेवा), तृप्ती देसाई (महिला सक्षमीकरण), डॉ. नीलिमा देसाई (समाजकार्य), मनीषा दुगड (उद्योग), अनुजा देशमाने (प्रशासन सेवा), मनीषा लुनावत (अध्यात्म), नम्रता फडणीस (पत्रकारिता), मीलन म्हेत्रे (पत्रकारिता) यांचा समावेश होता. 

डॉ. कोहिनकर पुढे म्हणाले, ‘जिथे महिलांचा सन्मान होतो. तिथे आनंदी वातावरण असते आणि सर्व शक्ती तिथे वास करतात. निसर्गानेही स्त्रीला अतिशय महत्वाचे स्थान दिलेले आहे. त्या माता, पत्नी, बहीण, मैत्रीण म्हणून आपल्या सगळ्यांनाच उभारी देत असतात. किंबहुना आपल्या जगण्याची प्रेरणा बनत असतात.’

सचिन ईटकर म्हणाले, ‘महिला सक्षमीकरणासाठी या नऊ महिलांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. आपापल्या क्षेत्रात आलेल्या आव्हानांना सामोरे जात स्वतःचा ठसा यांनी उमटवला आहे. सगळ्या क्षेत्रात महिला बरोबरीनेच नाही, तर पुरुषाच्या एक पाऊल पुढे टाकून काम करत आहेत, याचा आपल्या सगळ्यांना अभिमान वाटतो.’

स्त्रीशक्ती पुरस्कारप्राप्त महिलांनीही आपले अनुभव व्यक्त केले. डॉ. संजय चोरडिया यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले. शैलेंद्र कासंडे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link