Next
‘एमटीडीसी’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी सुहास दिवसे
प्रेस रिलीज
Sunday, July 29, 2018 | 05:00 PM
15 0 0
Share this story

‘एमटीडीसी’ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत चर्चा करताना सुहास दिवसे

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) सुहास दिवसे यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दिवसे हे २००९ साली आयएएस झाले असून, त्यांनी १६ जुलै २०१८ रोजी व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला. सध्या ते महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत आहेत. उद्यानविज्ञान शाखेचे ते पदव्युत्तर पदवीधारक आहेत. त्यांनी सिंगापूर येथील ली कुआन यू स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी येथून पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनचा अभ्यास केला आहे. सध्या ते आपत्ती व्यवस्थापन विषयात पीएच.डी. करत आहेत.

‘एमटीडीसी’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती होण्यापूर्वी दिवसे यांनी विविध जिल्ह्यांमध्ये अनेक पदांवर काम केले आहे. ते आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक आणि पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते.

व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर दिवसे यांनी लगेचच ‘एमटीडीसी’ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीसाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाचे संचालक आणि ‘एमटीडीसी’चे व्यवस्थापकीय सहसंचालक आशुतोष राठोड, ‘एमटीडीसी’च्या महासंचालक स्वाती काळे, प्रसिद्धी आणि जनसंपर्क विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक दिनेश कांबळे आणि इतर विभागप्रमुखांचा समावेश होता. त्यांनी ‘एमटीडीसी’च्या प्रकल्पांची आढावा बैठकही घेतली.

‘एमटीडीसी’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना दिवसे म्हणाले, ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामध्ये नवी जबाबदारी स्वीकारताना मला आनंद होत आहे. पर्यटन हे भारतातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि वेगाने वाढ होणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रातर्फे भारताच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्यात येते. म्हणूनच, राज्यातील पर्यटनाचा विकास आणि शाश्वत ठेवण्याच्या उद्दिष्टाने नवे कार्यक्रम आणि धोरणे आखून त्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्यटन संधी विकसित करून, विश्लेषण करून आणि समजून घेण्याकडे मी लक्ष केंद्रीत करणार आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link