Next
‘हस्तशिल्पी सिल्क’ प्रदर्शनाचा सोनल हॉलमध्ये शुभारंभ
प्रेस रिलीज
Friday, June 15, 2018 | 05:49 PM
15 0 0
Share this story

‘हस्तशिल्पी सिल्क’ प्रदर्शनाचे उद्घाटन अदिती द्रविड हिच्या हस्ते झाले. या वेळी संयोजक टी. अभिनंद उपस्थित होते.

पुणे : दरवर्षी प्रमाणे यंदाही हस्तशिल्पी या स्वयंसेवी संस्थेने हातमाग क्षेत्रातील आपल्या मातब्बर कारागिरांच्या उत्कृष्ट कलाकारीचे असंख्य नमुने पुणेकरांच्या भेटीला आणले आहेत. कर्वे रस्त्यावरील सोनल हॉलमध्ये भरलेल्या  ‘हस्तशिल्पी सिल्क’ या वस्त्र प्रदर्शनाचे शुक्रवारी (दि.१५ जून) युवा अभिनेत्री, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील ‘इशी’ म्हणजेच अदिती द्रविड हिच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी संयोजक टी. अभिनंद उपस्थित होते. 

या प्रदर्शनात १५ राज्यातील कारागीर सहभागी झाले असून, ६५ स्टॉल्स आहेत. सिल्क साड्या, ड्रेस मटेरियल, तयार कुर्ते, कॉटनसिल्क साड्या, ड्रेस मटेरियल यासह बेडशीट्स, दोहर असे अनेक प्रकार येथे आहेत. कर्नाटक, आंध्र, राजस्थान, पंजाब, हरयाणा, मध्यप्रदेश, जम्मू काश्मीर अशा विविध राज्यातील कारागीर येथे आले आहेत. या राज्यांची खासियत असलेली वस्त्र शैली येथे विविध रंगात, प्रकारात पाहायला मिळते. अगदी एक हजार पासून ते दोन लाख रुपये किंमतीच्या साड्याही या प्रदर्शनात पहायला मिळतात. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच चोखंदळ महिलावर्गाने येथे हजेरी लावायला सुरुवात केली आहे.
 
या वेळी संयोजक टी. अभिनंद म्हणाले, ‘ या प्रदर्शनात हँड ब्लॉनक प्रिंट साड्या, सूट आणि रेशमी बेड कव्हर्स, डिझायनर ड्रेस मटेरिअल, बॉर्डर, लेसेस्‌, कुर्ते, मटका आणि आसाम मुगा कापड, अपूर्व सिल्क साड्या, बलूचरी, ढाका मस्लीन, गीचा सिल्क साड्या, कांथा साड्या, झोरडोशी, लखनवी चिकन वर्क साड्या, भागलपुर सूट, प्रिंटेड सिल्क साड्या, बनारसी साड्या, माहेश्वरी, चंदेरी सिल्क साड्या, कोटा रेशीम, मलबेरी सिल्की विथ टेंपल बॉर्डर, बनारस जामदानी असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत.’

काही वर्षांपूर्वी याच प्रदर्शनात खरेदी केली होती, आता त्याच प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याचा मान मिळाला, याचा आनंद वेगळा असल्याची भावना अदितीने व्यक्त केली. पैठणी साडी आवडता साडी प्रकार असल्याचेही तिने सांगितले.  

नकारात्मक वातावरणात सकारात्मक कसे राहायचे याबाबत तिने ‘बाइटस ऑफ इंडिया’शी संवाद साधला. ‘निराश वाटत असेल तर बोला, आपल्या जवळच्या व्यक्तींशी, आपल्याला आधार वाटणाऱ्या व्यक्तींशी बोला, मनात साचू देऊ नका.’ असा सल्ला तिने दिला. तिचे मनोगत पाहा सोबतच्या व्हिडिओत...

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link