Next
रत्नागिरीत छायाचित्रण दिनानिमित्त कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद
BOI
Sunday, August 19, 2018 | 04:12 PM
15 0 0
Share this article:

प्री वेडिंग वर्कशॉपमध्ये फोटो टिपताना छायाचित्रकार.

रत्नागिरी :
  जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त रत्नागिरीत १८ आणि १९ ऑगस्ट रोजी प्री वेडिंग व पोस्ट वेडिंग फोटोग्राफी आणि त्या फोटोंचे एडिटिंग करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यशाळेला छायाचित्रकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘छायाचित्रकारांच्या क्षमतावृद्धीसाठी यापुढेही अशाच प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करू,’ अशी ग्वाही रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष व ज्येष्ठ छायाचित्रकार अजय बाष्टे यांनी दिली.

गणेशगुळे येथे प्री वेडिंग, मॉडेलिंग फोटोग्राफी करताना छायाचित्रकार.

१९ ऑगस्ट हा जागतिक छायाचित्रण दिन म्हणून पाळला जातो. त्या निमित्ताने रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिक संघटनेतर्फे दर वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. १८ आणि १९ ऑगस्ट २०१८ रोजी गणेशगुळे व रत्नागिरीमध्ये प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग फोटोग्राफी व फोटो एडिटिंग वर्कशॉप आयोजित करण्यात आला होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. १९ ऑगस्टला माळनाका येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला गणेशपूजन, कॅमेऱ्याचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून सुरुवात झाली.

जिल्ह्यातील बहुतांशी फोटोग्राफर्स या संघटनेचे सदस्य आहेत. त्यामुळे ही संघटना अधिक बळकट होत असल्याचे बाष्टे यांनी सांगितले. १८ ऑगस्टला गणेशगुळे येथील समुद्रकिनारी प्री वेडिंग फोटोग्राफी वर्कशॉप झाले. १९ ऑगस्टला रत्नागिरी शहरात पुण्यातील वैभव रासकर यांनी फोटो एडिटिंग कार्यशाळा घेतली.

या कार्यक्रमात छायाचित्रकार सचिव सुबोध भोवड, उपाध्यक्ष साईप्रसाद पिलणकर, यांच्यासमवेत सर्व पदाधिकारी, सदस्यांनी सहभाग घेतला. यामध्ये मंदार वायंगणकर, परेश राजिवले, राकेश बोरकर, दिलीप केळकर, आसिफ म्हसकर, प्रदीप हरचिरकर, संजय देवरूखकर, गौरव पिलणकर, प्रवीण भातडे, मधुकर सनगरे, अक्षय उकिरडे, साई आंबुलकर, समीर जुवेकर, महेश मोरे, रूपेश कदम, सुमुख जोग, प्रकाश सुवारे, नीलेश कोळंबेकर, सचिन शिंदे, अनुपम तिवारी, अनिकेत दुर्गवली, साईल बाष्टे, अमर शेठ, प्रसाद जोशी, काशीलिंग गोरड, शरद कोळेकर, अनिल पिश्टे, प्रवीण डावरे, सिद्धांत शिंदे, विनय बुटाला, नंदू सुर्वे, सचिन झगडे, शतानंद अंगवलकर, मकरंद पटवर्धन आदींचा सहभाग होता. सुभाष फोटोरत्न आणि स्मार्ट लॅबने या कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

पावस येथे रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिक संघटनेतर्फे अनसूया आनंदी महिला वृद्धाश्रमाला इलेक्ट्रिक कुकर भेट देताना अजय बाष्टे, सुबोध भोवड आणि सर्व सदस्य.

जपली सामाजिक बांधिलकी
जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिक संघटनेने सामाजिक बांधिलकी जपली. पावस येथे १९९५मध्ये स्थापन झालेल्या अनसूया आनंदी महिला वृद्धाश्रमाला संघटनेने इलेक्ट्रिक कुकर भेट म्हणून दिला. अल्पावधीत गरमागरम जेवण तयार करण्यासाठी या कुकरचा उपयोग होणार असल्याने सर्व महिलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.

(कार्यशाळेची झलक आणि अजय बाष्टे यांचे मनोगत सोबतच्या व्हिडिओत)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search