Next
शिवाजी हायस्कूलमधील मुलांनी हाताळली विविध भौगोलिक उपकरणे
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम
BOI
Thursday, January 24, 2019 | 12:35 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या भूगोल विभागातर्फे नुकतेच झाडगाव येथील शिवाजी हायस्कूलमध्ये भौगोलिक अभ्यासाच्या साधनांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. ‘जिओ’त्सव असे नाव त्याला देण्यात आले होते. दिवसभरात पाचशेहून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी ही उपकरणे हाताळली.या प्रदर्शनात प्लेन टेबल, थिओडोलाइट, डंपी लेव्हल, क्लायनोमीटर, वॉटर सॅम्पलर, सेडिमेंट कोअरर, टोटल स्टेशन, वायुवेगमापक, स्टिरिओ स्कोप, स्थलदर्शक नकाशे, हवास्थितीदर्शक नकाशे, खडकांचे नमुने, जीपीएस, पर्जन्यमापक, प्रिझमॅटिक कंपास आदी उपकरणांसह हवाई छायाचित्रे, नकाशे, ‘नॅशनल जिओग्राफिक’चे १९२४पासून १९८४पर्यंतचे अंक मांडण्यात मांडण्यात आले होते. गेली पाच वर्षे हा उपक्रम राबवला जात आहे. विद्यार्थ्यांना या गोष्टी पाहायला किंवा हाताळायला मिळत नाहीत. त्यामुळे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी झाली होती.


या उपक्रमात भूगोल विभागाचे विद्यार्थी प्रसन्न खानविलकर, ममता रांबाडे, सुयोग जालगावकर, शार्दूल रानडे, प्राजक्ता कुलकर्णी, निहाली गद्रे, श्वे,ता कांबळे, मिस्बा सोलकर, सबा, तृप्ती साळवी, शिफा भाटकर, मुग्धा पुरोहित, संकेत पाडळकर, स्वप्ना पुरोहित, सायली रहाटे, श्रद्धा, अक्षय चव्हाण, प्रथमेश, सर्वेश, विकास कीर यांनी विद्यार्थ्यांना उपकरणांची माहिती दिली.

(या उपक्रमाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Prathmesh mane About 211 Days ago
This was verry beautiful moment capture bye bytes of india positive media and press release network Thank you so much ..
0
0

Select Language
Share Link
 
Search