Next
‘जागतिक स्पर्धेत सक्षम होण्यासाठी ‘ग्लोबल एक्स्पो’ उपयुक्त’
डॉ. संजय चोरडिया यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Friday, March 22, 2019 | 01:00 PM
15 0 0
Share this article:

सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटतर्फे आयोजित ‘ग्लोबल एक्स्पो’च्या उद्घाटनप्रसंगी मनोज बर्वे, काझूको बारिसिक, टोमियो इसोगाई, आशिष जोशी, पुष्कर पानसे आदी मान्यवर व विद्यार्थी.

पुणे : ‘आज उद्योग क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. जागतिक बाजारपेठेशी स्पर्धा हे त्यापैकी एक आहे. उत्पादन आणि सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच कंपन्या वेगवेगळ्या देशांशी आयात-निर्यातीच्या स्वरूपात व्यवसाय करीत आहेत. म्हणूनच जागतिक बाजापेठेतील स्पर्धेत सक्षम होण्यासाठी ‘ग्लोबल एक्स्पो’सारख्या उपक्रमांची गरज आहे. चांगला व्यवस्थापक होण्यासाठी विद्यार्थ्यांना या उपक्रमाची मदत होईल,’ असे प्रतिपादन सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया यांनी केले.

‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट्स’मध्ये व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच ‘ग्लोबल एक्स्पो’चे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यवस्थापन क्षेत्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टीम वर्क आणि टीम बिल्डिंग अतिशय महत्त्वाचे असते. हीच बाब लक्षात घेऊन ‘सूर्यदत्ता’मध्ये वेगवेगळ्या कार्यशाळा, सेमिनार आणि तज्ज्ञांची व्याख्याने नियमित आयोजित केली जातात. त्याचाच एक भाग म्हणून बावधन येथील व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांनी हा ‘एक्स्पो’ आयोजिला होता.

‘ग्लोबल एक्स्पो’मधील विद्यार्थ्यांच्या संयुक्त अरब अमिराती देशाच्या दालनाला भेट देऊन माहिती घेताना टोमियो इसोगाई व इतर मान्यवर.

या एक्स्पोमधून विविध देशांच्या भौगोलिक, राजकीय आणि आर्थिक माहितीचे दर्शन घडले. विद्यार्थी, शिक्षक आणि इतरांना जागतिक व्यापार, व्यावसायिक स्थिती, सामाजिक, सांस्कृतिक वैशिष्ट्य आणि देशाची राजकीय धोरणे समजण्यासाठी या व्यासपीठाचा उपयोग झाला. ‘पीजीडीएम’ आणि ‘एमबीए’च्या विद्यार्थ्यांनी याचे आयोजन केले होते. पाच विद्यार्थ्यांचा एक गट अशा २३ गटांत विद्यार्थी विभागले गेले. प्रत्येक गटाने एक देश निवडला आणि भौगोलिक-राजकीय आणि आर्थिक माहितीचे सादरीकरण केले. त्यासाठी सर्च इंजिन, सोशल मीडिया, परस्परसंवाद आणि बाजार संशोधनाचा वापर करण्यात आला.

अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती, रशिया, जर्मनी, नेदरलँड, चीन, इंग्लंड आदी देशांचे दर्शन या एक्स्पोमध्ये घडविण्यात आले. त्यासाठी पावरपॉइंट सादरीकरणे, व्हिडिओ, माहिती आलेख, चार्ट्स, फ्लेक्स आणि इतर साधनांचा वापर करण्यात आला. संस्कृती, इतिहास, लोकसंख्या आणि विकास नमुनादेखील निवडलेल्या देशानुसार प्रत्येक गटाने सादर केला. एक हजारहून अधिक विद्यार्थी, कर्मचारी, अभ्यागत आणि उद्योग क्षेत्रातील लोकांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.

२३ गटांनी केलेल्या सादरीकरणामुळे २३ देशांची माहिती तपशीलवार समजली. या एक्सपोदरम्यान, आंतरराष्ट्रीय पाहुण्यांनी सहकाऱ्यांनी तसेच विद्यार्थी सहकारी गटांनी मूल्यांकन केले. (जर्मन फेडरेशन एसोसिएशन ऑफ एसएमई) बीव्हीएमडब्ल्यूचे भारतातील प्रमुख मनोज बर्वे जपानी कलाकार, सल्लागार आणि टॉमियो इसोगई इंडो-जपानी रिलेशनशिपचे सल्लागार काझुको बॅरिसिक, स्किल्समार्ट वर्ल्डचे संचालक आशिष जोशी, मार्केट रिस्क चेंज मॅनेजमेंटचे पुष्कर पानसे आदींनी एक्स्पोला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. एक्स्पोतील प्रथम पाच विजेत्या संघांना अनुक्रमे ११ हजार, सात हजार, पाच हजार, तीन हजार आणि एक रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

संस्कृतीविषयी आदानप्रदान करताना जपानी विद्यार्थी.

या वेळी बोलताना डॉ. चोरडिया म्हणाले, ‘जागतिक बाजापेठेतील स्पर्धेत सक्षम होण्यासाठी ‘ग्लोबल एक्स्पो’सारख्या उपक्रमांची गरज आहे. चांगला व्यावस्थापक होण्यासाठी विद्यार्थ्यांना या उपक्रमाची मदत होईल. विश्लेषणात्मक क्षमता विकास, सादरीकरणाची कला, विद्यार्थ्यांमधील संघ भावना, कौशल्य आणि व्यवस्थापकीय दृष्टिकोन वाढावा, हा या एक्स्पोमागील हेतू होता. आज उद्योग क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. जागतिक बाजारपेठेशी स्पर्धा हे त्यांपैकी एक आहे. उत्पादन आणि सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच कंपन्या वेगवेगळ्या देशांशी आयात-निर्यातीच्या स्वरूपात व्यवसाय करीत आहेत. जागतिक स्तरावरील आव्हानांचा सामना करता यावा, यासाठी सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जात आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search