Next
राजा शिवछत्रपती परिवारातर्फे स्वच्छता मोहीम
BOI
Thursday, October 04, 2018 | 12:14 PM
15 0 0
Share this article:

गणपतीपुळे मंदिर परिसर येथे करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले राजा शिवछत्रपती परिवाराचे मावळे आणि रणरागिणी

रत्नागिरी : महात्मा गांधी जयंतीनिमित्त राजा शिवछत्रपती परिवाराच्या रत्नागिरी विभागातर्फे श्री क्षेत्र गणपतीपुळे आणि किल्ले जयगड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत २४० हून अधिक जणांनी सहभाग घेतला.

उपक्रमाची सुरुवात सकाळी गणपतीपुळे येथे शिवगर्जना जनजागृती प्रभात फेरीने झाली. गणपतीचे दर्शन घेऊन संपूर्ण मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर किल्ले जयगड येथे किल्ल्याचे रखवालदार श्री. रहाटे यांच्या हस्ते गडपूजन करण्यात आले; तसेच ध्येयमंत्र, प्रेरणामंत्राने स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेदरम्यान तटबंदीवरील खुरटी झुडपे काढणे, किल्ल्याबाहेरील खंदक साफ करणे, बाहेरील तटबंदीवरील झुडपे तोडणे, किल्ल्यातील विहिरीवरील झुडपे तोडणे, विहिरीचा कठडा साफ करणे, धान्यकोठार साफ करणे, किल्ल्यातील मंदिर परिसरातील गवत काढणे ही कामे करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती देताना रत्नागिरी विभागाचे उपेंद्र नागवेकर म्हणाले, ‘राजा शिवछत्रपती परिवाराकडून सोशल नेटवर्किंगचा उपयोग करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या शिवरायांच्या मावळ्यांचा शोध घेतला जातो आणि असे मावळे आणि रणरागिणी एकत्र येऊन महिन्यातील एका रविवारी अशी मोहीम राबवतो. सध्या १९ जिल्ह्यांमध्ये अशी मोहीम राबविली जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील या मोहिमेसाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, रायगड, नाशिक, राजापूर, सत्कोंडी खंडाळा या ठिकाणांहून एकूण २४०हून अधिक मावळे व रणरागिणी सहभागी झाल्या होत्या.’

राजा शिवछत्रपती परिवारातर्फे राबविण्यात येणाऱ्या गड-किल्ले स्वच्छ व स्वच्छता मोहिमेत जास्तीत जास्त मावळे आणि रणरागिणींनी सहभागी होण्याचे आवाहन नागवेकर यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search