Next
‘साहसी खेळांमुळे मधुमेहींना फायदा’
प्रेस रिलीज
Wednesday, November 15 | 04:17 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘माणूस जंगलात राहत असताना शिकारीसारखी साहसी जीवनशैली होती. ती गमावल्याने मधुमेह माणसाच्या जीवनात आला. शहरी जीवनशैलीतील मधुमेह दुरुस्त करायचा असेल, तर परत शिकारीकडे वळता येणार नाही; मात्र साहसी खेळ हा मधुमेहावर उपाय आहे, असे प्रतिपादन आयसर संस्थेतील जीवशास्त्रज्ञ डॉ. मिलिंद वाटवे यांनी केले.

जागतिक मधुमेह दिनानिमित्त ‘चेजिंग पॅराडाईमस् इन डायबेटीस’ (डायबेटिसच्या बदलत्या व्याख्या) या विषयावर परिषदेचे आयोजन केले होते. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. भारतीय आहारसंस्थेची पुणे शाखा आणि डॉ. शिरोडकर्स हेल्थ सोल्यूशन प्रा. लि. यांच्यातर्फे १४ नोव्हेंबरला आयोजित केली होती. या ​परिषदेला चांगला प्रतिसाद मिळाला. ​डॉ. वाटवे यांच्याबरोबरच डायबेटीससाठी आयुर्वेद या भारत सरकारच्या प्रोटोकोल कमिटीच्या तज्ज्ञ सदस्य डॉ. ज्योती शिरोडकर आणि ‘भारतीय आहारसंस्थे’च्या शारदा अडसूळ या तज्ज्ञांनी परिषदेत मार्गदर्शन केले. पुण्यातील साधारण १०० डॉक्टर, आहारतज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले होते.

डॉ. वाटवे म्हणाले, ‘रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे म्हणजे मधुमेहावर उपचार अशी अजूनही वैद्यकीय व्यवसायाची श्रद्धा आहे. त्याला अजिबात पुरावे नाहीत. जीवनशैलीतील बदलाने मधुमेहासारखे त्रास होत आहेत. साहसी खेळातून ​‘न्यूरो एंडो क्राईम पाथ’ वापरले जातात आणि इन्शुलिन निर्मितीला मदत होते. ‘एंडो क्रॉनिक ग्रोथ फॅक्टर्स’ निर्माण होण्याने मधुमेहाला दूर ठेवण्यास मदत होते.’

‘जंगलातील जीवनशैलीत जी आव्हाने स्वीकारायची मानवाला सवय होती, ती आव्हाने साहसी खेळातून मानवाने पुन्हा स्वीकारण्याची सवय लावली पाहिजे. ​या संशोधनावर आधारित ‘बिहेव्हीअरल इंटरव्हेंन्शन फॉर लाईफस्टाईल डिसऑर्डर’ क्लिनिक (बिल्ड क्लिनिक) पुण्यात उभारले जात आहे,’ अशी माहितीही डॉ. वाटवे यांनी दिली.


या वेळी ‘डॉ. शिरोडकर्स’चे व्यवस्थापकीय संचालक अजय शिरोडकर, भारतीय आहारसंस्थेच्या पुणे शाखेच्या अध्यक्ष प्रा. अनुजा किणीकर, आहारतज्ञ मेधा पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते. ‘मधुमेहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वंकष असावा,’ असे मत प्रा. अनुजा किणीकर यांनी व्यक्त केले.

डॉ. ज्योती शिरोडकर म्हणाल्या, ‘नेहमीपेक्षा अधिक घाम येणे हे जसे मधुमेहाचे लक्षण आहे; तसेच सतत वातावरणात पंखा, गार हवा, थंड पाणी हवेसे वाटणे, हेही मधुमेहाचे लक्षण आहे. मधुमेह व इतर नॉनकम्युनिकेबल रोगांच्या भारतातील पसरणार्‍या महालाटेविरुद्ध काम करण्यासाठी, डायबेटीसच्या बदलत्या व्याख्या समजून घेण्याची नितांत गरज आहे.’

डॉ. शिरोडकर पुढे म्हणाल्या, ‘आयुर्वेदात मधुमेहाला प्रमेह म्हटले आहे. लठ्ठ असलेल्या रुग्णाला पंचकर्माचा फायदा होतो; मात्र सडपातळ रुग्णाला योग्य आहाराचा उपयोग होतो. मधुमेह बरा करण्यासाठी आहार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आहारतज्ज्ञांची भूमिका यासंदर्भात महत्वाची ठरते. आधुनिक आहारतज्ज्ञ आणि आयुर्वेदिक आहारतज्ज्ञ यांची भूमिका मधुमेहाची महालाट परतविण्यात निर्णायक आणि महत्त्वाची ठरणार आहे. यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे.’

अमेरिकन डायबेटीस असोसिएशन’ने २०११ पासून क्लिनिकल प्रॅक्टिस, गाईडलाइन (सीपीजी २०११) मध्ये समाविष्ट केलेल्या ‘मेडिकल न्यूट्रीशन थेरपी’ या विषयी आधुनिक आहारतज्ज्ञ श्रद्धा अडसूळ यांनी माहिती दिली.

‘डॉ. ज्योती शिरोडकर यांच्या दीर्घ संशोधनातून तयार झालेली, इंटरनॅशनल पेटंट मिळालेली हेल्थ फूड आयुर्वेद व आधुनिक आहारशास्त्र यांची सांगड घालून तयार केलेले, प्रयोगशालेय तपासण्या, प्रत्यक्ष रुग्ण-निरोगी व्यक्ती यांवर चाचण्या करून सिद्ध झालेले आहे. विशिष्ट कडधान्ये व तृणधान्ये यावर ग्रंथोक्त संस्कार करून बनविलेली उत्पादने ग्राहकांच्या पंसतीस उतरत आहे,’ अशी माहिती ‘डॉ. शिरोडकर्स’चे संचालक अजय शिरोडकर यांनी दिली.

मधुमेहींसाठी तयार केलेल्या आणि पेटंट मिळालेल्या आहार उत्पादनांचे सादरीकरण या परिषदेत करण्यात आले. त्यात हेल्थ आटा, स्नॅकमिक्स, हेल्थ ड्रिंक यांचा समावेश होता. या परिषदेच्यानिमित्ताने मधुमेहाची महालाट परतविण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन विकसित करण्याच्या दिशेने आणि तशी कृती योजना आखण्याच्या दिशेने पाऊल उचलण्याविषयी सर्व तज्ञांनी चर्चा केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link