Next
‘मदरहूड’मध्ये नवजात बालकाला नवसंजीवनी
प्रेस रिलीज
Saturday, September 01, 2018 | 12:19 PM
15 0 0
Share this article:

आई- वडील आणि मदरहूड हॉस्पिटलच्या बालरुग्ण आणि नवजात रुग्ण विभागाचे प्रमुख डॉ. तुषार पारीख यांच्यासह एक महिन्याचा शिवांशपुणे : श्वासोच्छवास करण्यास अडथळा होत असलेल्या एक महिन्याच्या नवजात बालकाला मदरहूड हॉस्पिटलच्या बालरुग्ण आणि नवजात रुग्ण विभागाचे प्रमुख डॉ. तुषार पारीख यांच्या नेतृत्वाखालील टीम, कन्सल्टंट निओनॅटोलॉजिस्ट डॉ. मुबाशीर शाह आणि सल्लागार बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन भिसे ‘सडन इन्फंट डेथ सिंड्रोम’ (सिड्स) या परिस्थितीतून नवसंजीवनी देण्यात आली.

शिवांश या नवजात बालकाला घरी श्वासोच्छवास करणे कठीण जात असल्याने त्याचे शरीर निळे पडून थंड झाले होते. त्याचे वडील स्नेहशंकर हे नुकतेच कार्यालयातून घरी आले होते आणि शिवांशची परिस्थिती त्यांना जाणवली. त्यांनी प्रसंगावधान दाखवत अजिबात वेळ न दवडता कार्डिओपल्मोनरी रेस्युसिटेशन (सीपीआर) देण्यास सुरुवात केली आणि मदरहूड हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत तोंडावाटे (माउथ टू माउथ) श्वास देत राहिले. त्यांनी दिलेल्या ‘सीपीआर’मुळे शिवांशला हॉस्पिटलमध्ये दाखल करेपर्यंत त्याची प्रकृती स्थिर होती. बालरुग्ण आणि नवजात रुग्ण विभागाचे प्रमुख डॉ. तुषार पारीख यांच्या नेतृत्वाखालील टीम, कन्सल्टंट निओनॅटोलॉजिस्ट डॉ. मुबाशीर शाह आणि सल्लागार बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन भिसे यांनी ‘सिड्स’ या परिस्थितीतून रुग्णाचा जीव वाचवला.

‘मदरहूड’मधील सल्लागार निओनॅटोलॉजिस्ट डॉ. मुबाशीर शाह म्हणाले, ‘खराडी येथील मदरहूड हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री तीन वाजता एक महिन्याच्या मुलाला त्याचे आई-वडील घेऊन आले. बाळाचे शरीर निळे पडले होते. तो श्वासोच्छवास करत नव्हता आणि त्याच्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग अत्यंत कमी होता; तसेच नाडीचे ठोकेसुद्धा क्षीण होते. बाळाने श्वासोच्छवास करावा आणि त्याच्या हृदयातून रक्ताचे पम्पिंग व्हावे यासाठी आवश्यक असलेले रेस्युशिटेटिव्ह उपाय तातडीने करण्यात आले. त्याला परिणामकारकपणे रेस्युशिटेट करण्यात आले आणि श्वासोच्छवासासाठी मदत करण्यासाठी व्हेंटिलेटर लावण्यात आला. त्याचप्रमाणे हृदय यंत्रणेला सहाय्य करण्यासाठी व रक्तदाबात सुधारणा करण्यासाठी औषधे देण्यात आली.’

‘मुलाचे वडील स्नेहशंकर झा रात्री एक वाजण्याच्या सुमारास कार्यालयातून घरी आले तेव्हा त्यांना जाणवले की त्यांचा मुलगा श्वासोच्छवास करत नाहीये. आई-वडिलांना त्याला हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे शरीर निळे पडले होते आणि थंड लागत होते. त्यांनी त्या बाळाला तोंडावाटे श्वास देण्याचा प्रयत्न केला आणि मदरहूड हॉस्पिटलमध्ये दाखल करेपर्यंत त्यांचे प्रयत्न सुरू होते. या जीवावर बेतलेल्या प्रसंगापूर्वी ताप, श्सावोच्छवासास त्रास होणे, श्वासोच्छवासाचा वेग वाढणे किंवा उलटी होणे अशी कोणतीही लक्षणे दिसली नव्हती. फक्त त्याची पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये मुदतपूर्व प्रसूती झाली होती, एवढीच काय ती वावगी बाजू होती,’ असे डॉ. शाह यांनी सांगितले.

बालरुग्ण आणि नवजात रुग्ण विभागाचे प्रमुख डॉ. पारीख म्हणाले, ‘बाळाचा जीव वाचविण्याचे सर्व श्रेय त्याच्या वडिलांना जाते. त्यांनीच प्रसंगावधान दाखवत बाळाला ‘सीपीआर’ दिला आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करेपर्यंत त्याची प्रकृती स्थिर राहील याची खातरजमा केली. त्यानंतर वैद्यकीय टीमने ही आव्हानात्मक केस हाती घेतली. बाळाच्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता झाल्यामुळे (हायपॉक्सिक) हृदयक्रिया बंद पडणे, मूत्रपिंडाला इजा होणे, रक्तस्त्रावाच्या समस्या आणि शुद्ध हरपणे असे परिणाम झाले होते. ‘सिड्स’ या परिस्थितीत नवजात बालके अचानक दगावतात. हे बाळ ‘सिड्स’मधून बचावले. आमच्या डॉक्टरांच्या टीमने सुयोग्य, सक्षम आणि वेळेवर व्यवस्थापन केल्यामुळे डॉक्टरांनी बाळाचा जीव वाचवला.’

‘सिड्स टाळण्यासाठी बाळांना पाठीवर झोपवावे (पोटावर किंवा कुशीवर झोपवू नये). आई-वडील मद्यपान करत असतील आणि आई धुम्रपान करत असेल, तर त्याचा संबंध ‘सिड्स’शी जोडला गेला आहे. या प्रकरणात मात्र असे कोणतेही धोकादायक घटक संबंधित नव्हते. त्याचप्रमाणे स्तनपानामुळेही ‘सिड्स’पासून संरक्षण प्राप्त होते,’ असे डॉ. पारीख यांनी नमूद केले.

‘मदरहूड हॉस्पिटलमधील लेव्हल थ्री निओनॅटल आयसीयूमध्ये बाळावर उपचार करण्यात आले. बाळाला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर आठ तासांनी त्याची शुद्ध हरपली. त्या वेळी त्याला अँटीकन्व्हल्सन्ट औषधे देऊन त्याच्यावर उपचार केले. तीन दिवसांनी त्याचा व्हेंटिलेटर काढण्यात आला आणि पुढील दोन दिवस त्याला नॉन-इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशनवर ठेवण्यात आले. त्याच्या पोषणाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सुरुवातीला इन्ट्राव्हेनस डेक्स्ट्रोस देण्यात आला आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याच्या तिसऱ्या दिवसापासून ट्युबफीडिंग सुरू केले. तोपर्यंत बाळाचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके सामान्य झाले होते. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याच्या पाचव्या दिवसापासून तोंडावाटे अन्न देण्यास सुरुवात केली. त्यावेळी बाळ पुरेसे चोखत होते आणि सामान्य रीतीने अन्न गिळू लागले होते,’ अशी माहिती डॉ. पारीख यांनी दिली.

स्नेहशंकर झा म्हणाले, ‘मदरहूड हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी हा एक चमत्कारच घडवून आणला. सकारात्मक दृष्टिकोन आणि डॉक्टरांची तळमळ यांमुळेच आमच्या बाळाचा जीव वाचला. आमच्या बाळाच्या प्रकृतीत होत असलेल्या सुधारणेबाबत ते आम्हाला वेळोवेळी माहिती देत होते. माझ्या बाळाला नवसंजीवनी दिल्याबद्दल मी मदर हॉस्पिटलमचे मनापासून आभार मानतो.’
 
‘मदरहूड हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सुविधा आहेत. त्यात लेव्हल थ्री निओनॅटल आयसीयू, सर्वोत्तम निओनॅटल आणि बालरोगतज्ज्ञांची टीम आणि निओनॅटल किंवा बालरुग्णांबाबत आलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीसाठी अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, मुदतपूर्व प्रसूती, शस्त्रक्रिया करताना नवजात बालकांमध्ये निर्माण झालेल्या समस्या यावर या ह़स्पिटलमधील वरिष्ठ अत्यंत तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ आणि ऑब्स्टेट्रिशिअनतर्फे उत्तम उपचार केले जातात,’ अशी माहिती ‘मदरहूड’चे फॅसिलिटी डायरेक्टर डॉ. कृष्णा मेहता यांनी दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search