Next
जेहान
BOI
Monday, October 15 | 10:11 AM
15 0 0
Share this story

समलिंगी संबंध या विषयाला स्पर्श करणारी ‘जेहान’ ही कादंबरी डॉ. विजय पाटील यांनी लिहिली आहे. जय देशमुख उर्फ जेन्स हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता. फेसबुकवर त्याची जेहान आगाशे याच्याशी ओळख होते. त्याच्या नावात वेगळेपण असतेच, पण त्याचा स्वभावही आवडतो. दोघांचे फेसबुकवर चॅटिंग सुरू होते. एखाद दिवस ‘एफबी’वर भेटले नाही, तर दोघांना हुरहूर लागत होती. दोघांची प्रत्यक्ष भेट झाल्यावर त्यांची मैत्री गाढ होते.

जेहानच्या वडिलांच्या आजारपणात जय मदत करतो. त्यामुळे त्याचे आई-वडीलही कृतज्ञ असतात. जयमुळेच जेहान नृत्यदिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत स्थिरावतो. या दरम्यान त्यांच्या गाठीभेटी वाढत असतात. दोघांनाही एकमेकांचे आकर्षण वाटू लागते. दोघेही एकमेकांना सर्वस्व बहाल करतात. त्यांची जवळीक ‘गॉसिप’चा विषय होते. दोघांचे एक वेगळे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर टीकाही होऊ लागते; पण या सर्व काळात जय संयमी राहतो. जेहानचे आई-बाबाही त्यांना समजावून घेतात. त्यामुळे टीका, चिखलफेक याची भीती दूर सारून सर्वांनी एकत्र राहण्याचा निर्णय जय घेतो.  

प्रकाशक : अक्षरब्रह्म पब्लिकेशन
पाने : १७४
किंमत : २०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link