Next
‘लेक माझी लाडकी’मध्ये ऋषीची पुन्हा एंट्री
प्रेस रिलीज
Wednesday, September 05, 2018 | 01:33 PM
15 0 0
Share this article:



मुंबई : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरू असलेली ‘लेक माझी लाडकी’ ही लोकप्रिय मालिका आता नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. मीराच्या आयुष्यातून निघून गेलेल्या ऋषीची मालिकेत पुन्हा एंट्री होत आहे.

‘लेक माझी लाडकी’ ही मालिका सोमवार ते शनिवार या कालावधीत सायंकाळी ६.३० वाजता प्रसारित केली जाते. मीराचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या ऋषीला काही दिवसांपूर्वीच त्याच्या पापाची शिक्षा मिळाली. ऋषीच्या मृत्यूनंतर मीराने नव्याने आयुष्याला सुरुवात केली. तिच्या या कठीण काळात तिला विजयने साथ दिली; मात्र मीराच्या आयुष्यातला संघर्ष अजून संपलेला नाही.

मीराला नि:स्वार्थपणे मदत करणाऱ्या विजयसोबत तिचे नेमके काय नाते आहे, विजयने तिला का मदत केली, असे अनेक प्रश्न जवळच्याच माणसांकडून तिला विचारण्यात येत आहेत. विजय आणि मीराच्या नात्यावर शंका घेण्यात आल्यामुळेच अखेर मंदिरातच विजयने मीरासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या लग्नामुळे हा गुंता सुटेल असे वाटत असतानाच मालिकेत पुन्हा ऋषीची एंट्री होणार आहे.

ऋषीच्या परत येण्याने मीराच्या आयुष्यातला तणाव पुन्हा वाढणार का, ती या परिस्थितीचा सामना कसा करणार, ऋषीचा पुढचा डाव नेमका काय असणार, या साऱ्या प्रश्नांची उत्तरे या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मिळणार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search