Next
जॉन ल कॅरी, दिवाकर कृष्ण केळकर
BOI
Thursday, October 19 | 04:00 AM
15 0 0
Share this story

जॉर्ज स्माइली या लोकप्रिय डिटेक्टिव्ह व्यक्तिरेखेचा जन्मदाता जॉन ल कॅरी आणि मराठी लघुकथेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे दिवाकर कृष्ण केळकर यांचा १९ ऑक्टोबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
...............
जॉन ल कॅरी 

१९ ऑक्टोबर १९३१ रोजी डॉर्सेटमध्ये जन्मलेल्या डेव्हिड जॉन कॉर्नवेलनं ‘जॉन ल कारी’ या टोपणनावानं गुप्तहेर कथा लिहिल्या आणि जगभरच्या रसिकांनी त्या अक्षरशः डोक्यावर घेतल्या. 

‘एमआय सिक्स’ या ‘ब्रिटिश सिक्रेट इंटेलिजन्स सर्व्हिस’मध्ये काम करत असल्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय हेरजालाची चांगलीच माहिती होती आणि त्याचा उपयोग करून त्यानं कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली. त्याची पहिली कादंबरी होती ‘कॉल फोर दी डेड,’ ज्याच्यात त्यानं जॉर्ज स्माइली या डिटेक्टिव्हला जगासमोर आणलं आणि नंतरही  कॅरीच्या अनेक कादंबऱ्यामधून तो रसिकांना भेटत राहिला. 

कॅरीला अभूतपूर्व यश मिळालं ते त्याच्या ‘दी स्पाय हू केम इन फ्रॉम कोल्ड’ या तिसऱ्या कादंबरीमुळे, जी जगभरात बेस्टसेलर कादंबरी ठरली. त्यानंतर त्यानं पूर्ण वेळ लेखन करण्यासाठी नोकरी सोडली.

टिंकर टेलर सोल्जर स्पाय, दी ऑनरेबल स्कूलबॉय, ए डेलिकेट ट्रुथ, ए लीगसी ऑफ स्पाइज, दी पिजन टनेल, ए मर्डर ऑफ क्वालिटी, स्माईलीज पीपल, दी लूकिंग ग्लास वॉर, दी सिक्रेट पिल्ग्रिम, ए परफेक्ट स्पाय, दी नाईट मॅनेजर, दी लिटल ड्रमर गर्ल, ए स्मॉल टाउन इन जर्मनी, अवर काइंड ऑफ ट्रेटर – अशी त्याची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
.............

दिवाकर कृष्ण केळकर

१९ ऑक्टोबर १९०२ रोजी गुंटकलमध्ये जन्मलेले दिवाकर कृष्ण केळकर हे मराठी लघुकथेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षी १९२२ साली ‘मासिक मनोरंजन’च्या अंकात त्यांची ‘अंगणातला पोपट’ ही पहिली कथा प्रसिद्ध झाली होती. 

त्यांच्या कथा तरल भावाविष्कार दाखवणाऱ्या असत. त्यांचा ‘समाधी’ हा कथासंग्रह विशेष गाजला होता. १९५४ साली लातूरमध्ये भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

रूपगर्विता आणि सहा गोष्टी, महाराणी आणि इतर कथा, किशोरीचे हृदय, विद्या आणि वारुणी, तोड ही माळ असं त्याचं लेखन प्रसिद्ध आहे.

३१ मे१९७३ रोजी हैदराबादमध्ये त्यांचं निधन झालं. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link