Next
‘एफटीआयआय’तर्फे चित्रपट समीक्षण आणि परीक्षणाचा नवा अभ्यासक्रम
प्रेस रिलीज
Thursday, April 11, 2019 | 03:34 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेने (एफटीआयआय) एका नव्या उपक्रमाद्वारे ‘चित्रपट समीक्षण आणि परीक्षण’ या विषयावर २० दिवसीय अभ्यासक्रमाचे नवी दिल्ली येथील भारतीय जनसंचार माध्यम संस्थेत (आयआयएमसी) आयोजन केले आहे.

या विषयी अधिक माहिती देताना ‘एफटीआयआय’चे संचालक भुपेंद्र कँथोला म्हणाले, ‘देशात पहिल्यांदाच होणाऱ्या या अभ्यासक्रमामुळे चित्रपट समीक्षक, परीक्षक, फिल्म ब्लॉगर्स, संशोधक, फिल्म अभ्यासक आणि सिनेमा विषयात विशेष रुची असणाऱ्या कोणाही व्यक्तीची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी पूर्ण होईल. कोणीही व्यक्ती चित्रपट परीक्षण करू शकते हा गैरसमज असून, चित्रपट ‘वाचण्याची’ कला अवगत असल्याशिवाय, तसेच चित्रपटावर भाष्य करण्यासाठी प्रचंड शिस्त आणि व्यक्त होण्याचे कौशल्‍य अंगी असल्याशिवाय परीक्षणाचे स्वातंत्र्य उपभोगता येऊ शकत नाही.’

अभ्यासक्रमाच्या संचालिका रजुला शाह म्हणाल्या, ‘हा अभ्यासक्रम चित्रपट परीक्षणाचे मूलभूत प्रशिक्षण देण्यासाठी बनविण्यात आला आहे. प्रशिक्षणार्थ्यांचे चित्रपटाचा इतिहास आणि ते बनवण्याची कला यांबाबतचे ज्ञान वृद्धिंगत करून तसेच त्याची परीक्षणाची कला विकसित करून त्याला एक सक्षम परीक्षक बनवू इच्छितो. चित्रपटाच्या चिकित्सक अभ्यासामुळे संवेदनशीलता विकसित होऊन परीक्षकांना दृष्टीकोन, ज्ञान आणि संकल्पना यातून जनसामान्यांच्या मतावर प्रभाव टाकता येईल. या अभ्यासक्रमात चित्रपटाच्या इतिहासातील महत्त्वाच्या चित्रपटांच्या सखोल अभ्यासाचा अंतर्भाव आहे.

चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये भारताचे प्रशिक्षण (SKIFT-Skilling India in Film and Television) या उपक्रमाअंतर्गत ‘एफटीआयआय’तर्फे हा अभ्यासक्रम चालवला जाणार असून, या प्रकारचे आजवर १३५ अभ्यासक्रम ३७ शहरांमध्ये झाले आहेत. यातून पाच हजार ८०० चित्रपटप्रेमींचे प्रशिक्षण झाले आहे. या अभ्यासक्रमासाठी वयाचे बंधन नसून नोंदणी करण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल २०१९ आहे. दिल्लीबाहेरील काही निवडक प्रशिक्षणार्थींना राहण्याची सोय उपलब्ध केली जाईल.

अभ्यासक्रमाच्या सविस्तर माहितीसाठी वेबसाइट : www.ftii.ac.in
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search