Next
२३ भाषांमध्ये प्रदर्शित होणार ‘पीएम नरेंद्र मोदी’
चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; चित्रपट येणार पाच एप्रिलला
BOI
Friday, March 22, 2019 | 03:51 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता आहे. त्यात सध्या लोकसभा निवडणुकांची देशभर धामधुम सुरू असताना या चित्रपटाची सर्वजन वाट पाहत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून निवडणुकांपूर्वी पाच एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नरेंद्र मोदी यांचा लहानपणापासून ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. 

दिग्दर्शक ओमंग कुमार दिग्दर्शित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारत आहे. विवेक ओबेरॉयने नुकतेच आपल्या ट्विटर अकाउंटवरून चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला असून त्याला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना दाखवण्यात आल्या आहेत. एक सामान्य चहा विक्रेता ते एका सर्वांत मोठी लोकशाही असणाऱ्या देशाचा पंतप्रधान हा मोदी यांचा प्रवास, त्यांची वाटचाल, लोकांची मिळालेली साथ, त्यांची धोरणे, त्यांची वैचारिक वाटचाल, या प्रवासात त्यांना आलेल्या अडचणी आणि अखेर यातून मार्गक्रमण करत आपले कर्तव्य निभावलेला एक पंतप्रधान अशा घटनांवर या चित्रपटातून प्रकाश टाकला गेला आहे. 

या ट्रेलरवर संमिश्र प्रतिक्रीया मिळत असल्या, तरीही तो उत्सुकतेने पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याआधी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख १२ एप्रिल ठरवण्यात आली होती, परंतु गोवा कॉंग्रेसच्या वतीने याचा विरोध करण्यात आला. निवडणुकांच्या काळात राजकीय हेतू साध्य करण्यासाठी या चित्रपटाचा वापर केला जात असल्याची टीका त्यांनी केली होती. इतकेच नाही तर चित्रपटावर बंदी आणण्यात यावी, असे पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवले होते. परिणामी चित्रपट प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. अभिनेता विवेक ओबेरॉयसह बोमन इराणी, इरीना बहाव, मनोज जोशी, प्रशांत नारायण, बरखा बिष्ट हे कलाकार या चित्रपटातून दिसणार आहेत.   


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search