Next
‘ऑस्कर मिळाल्यानंतरही त्यांचा स्वभाव बदलला नाही’
मुलगी खातिजा रेहमानने केले ए. आर. रेहमानचे कौतुक
BOI
Wednesday, February 06, 2019 | 03:32 PM
15 0 0
Share this story


मुंबई : ‘मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे तो केवळ ते एक मोठे आणि जागतिक दर्जाचे संगीतकार आहेत म्हणून नाही, तर त्यांच्यात एक वडील आणि माणूस म्हणून असलेल्या काही चांगल्या मुल्यांमुळे’, असे म्हणत ए. आर. रेहमान यांची मुलगी खातिजा हिने रेहमान यांचे कौतुक केले. 

निमित्त होते ‘स्लमडॉग मिलियनेयर’ चित्रपट संगीताच्या दशकपूर्तीचे, ज्या चित्रपटाच्या संगीताने सर्वोत्कृष्ठ सन्मान ऑस्करचे आठ पुरस्कार आपल्या नावे केले. यानिमित्ताने मुंबईतील धारावी झोपडपट्टीच्या परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘स्लमडॉग मिलियनेयर’ चित्रपटाची संपूर्ण संगीताची टीम उपस्थित होती. गीतकार गुलजारदेखील आवर्जून उपस्थित होते. याशिवाय गायक सुकविंदर सिंग, इला अरुण, महालक्ष्मी अय्यर, विजय प्रकाश आणि अभिनेते अनिल कपूर हेदेखील होते. खातिजा आणि ए. आर. रेहमान यांच्याशी संवाद साधण्यात आला त्या वेळी खातिजाने ए. आर. रेहमान यांचे तोंडभरून कौतुक केले. 

‘संपूर्ण जग त्यांच्या संगीतातील कामामुळे किंवा त्यांनी मिळवलेल्या पुरस्कारांमुळे त्यांना ओळखत असेल, परंतु आम्ही भावंडे त्यांचा आदर करतो ते त्यांच्यातील असंख्य चांगल्या गुणांमुळे जे त्यांनी आमच्यातही पुरेपूर रुजवण्याचा प्रयत्न केला आहे, करत आहेत. त्यांच्यातला माणुसकीचा गुण मला सर्वांत जास्त भावतो. ऑस्करचे आठ पुरस्कार मिळूनही मागच्या दहा वर्षांत त्यांच्यातली एकही गोष्ट बदललेली नाही. दुसरी मला त्यांच्यातली आवडणारी गोष्ट म्हणजे समाजाप्रती असलेली त्यांची भावना. ते भरपूर प्रमाणात सामाजिक कार्य करतात, लोकांना मदत करतात. परंतु कित्येकदा ही गोष्ट बाहेरच्यांना तर दूरच, आम्हाला घरातही ठाऊक नसते. ते कधीच स्वतःहून त्याचा उल्लेखही करत नाहीत’, अशा अनेक गोष्टी खातिजाने सांगितल्या.

अशा सगळ्या गोष्टी सांगताना खातिजाने रेहमान यांना विचारले, ‘याप्रसंगी तुम्ही आम्हा भावडांना आणि एकंदरीतच तरुणांना काय संदेश द्याल’, यावर बोलताना रेहमान म्हणाले, ‘मी सहसा कोणाला उपदेश वगैरे देत नाही. माझी मुले मोठी असताना मी फक्त त्यांना तेच शिकवण्याचा प्रयत्न केला, जे माझ्या आईने मला त्या वयात शिकवले. आता मुले मोठी आहेत, तेव्हा त्यांनी त्यांच्या मनाचा आवाज ऐकावा आणि देव त्यांना नक्कीच योग्य गोष्टी करण्याचे उपदेश देईल असे वाटते.’

चित्रपटाच्या दशकपूर्तीच्या या कार्यक्रमात सर्वांनी आपल्या आठवणी शेअर केल्या.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link