Next
देवबोध
BOI
Wednesday, October 17, 2018 | 10:10 AM
15 0 0
Share this article:

ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद या चार वेदांमध्ये उपनिषदांचा समावेश होतो. हिंदू तत्त्वज्ञानाचा, विचारधारेचा पाया म्हणजे उपनिषदे. एकूण २०० उपनिषदांची नोंद असून, सर्वांत जुनी असलेली डझनभर उपनिषदे असून, ती मुख्य मानली जातात, अशी माहिती देत प्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णी यांनी ‘देवबोध’मधून मुख्य उपनिषदांचे सोप्या मराठीत रूपांतर केले आहे.

ऋग्वेद संहितेतील ऐतरेय उपनिषदाविषयी माहिती देताना त्याचे सिद्धांत, अध्याय चार, पाच, सहाचे स्पष्टीकरण दिले आहे. यजुर्वेद संहितेमधील ईश उपनिषद, तैत्तिरीय, कठ आणि बृहत आरण्य उपनिषदाबद्दल सांगताना शब्द व्युत्पत्ती, सारांश, उपदेश, तैत्तिरीय अरण्यकाचे सात, आठ व नवव्या अध्यायाचे विवेचन केले आहे. सामवेदातील केन आणि छांदेय उपनिषद, अथर्ववेदातील मुंडक, मांडुक्य व प्रश्न उपनिषदांमध्ये नेमके काय आहे, त्याचा अर्थ यातून समजावून दिला आहे. श्वेताश्वतर, कौशितकी व मैत्रेयामणीय या इतर उपनिषदांची माहितीही दिली आहे.       

प्रकाशक : दीर्घायु इंटरनॅशनल
पाने : ३१२
किंमत : ४७५ रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search