Next
ठाणे येथे ३१वे राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलन
BOI
Friday, November 24 | 05:42 PM
15 0 0
Share this story

ठाणे : होप नेचर ट्रस्ट आणि महाराष्ट्र पक्षीमित्र यांच्या संयुक्त विद्यमाने ३१वे राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलन येथे आयोजित करण्यात आले आहे.

संमेलनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी होणार असून त्यानंतर सलग विविध पक्षी तज्ज्ञांच्या अनुभवांचा उलगडा होणार आहे. यंदाच्या पक्षीमित्र संमेलनाचे अध्यक्ष नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्याच्या निर्मितीमध्ये भूमिका बजावणारे ज्येष्ठ पक्षीमित्र दत्ताजी उगावकर हे असणार आहे.

ठाण्याच्या खाडी किनाऱ्यावरील समृध्द जैवविविधता स्थलांतरीत पक्षांना आकर्षित करत असताना ‘होप’ने पक्षीमित्र संमेलनाच्या आयोजनाच्या निमित्ताने पक्षी मित्रांनाही ठाण्याकडे आकर्षित केले आहे. संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मावळत्या संमेलनाचे अध्यक्ष विजय दिवाण, नवे अध्यक्ष दत्ताची उगावकर यांच्यासह ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे आणि आयुक्त संजीव जैस्वाल उपस्थित राहणार आहेत.

‘होप’च्या डॉ. दिपा राठी, डॉ. माधुरी पेजावर आणि पक्षीमित्र संस्थेचे भाऊ काटदरे संमेलनाची प्रस्तावना करतील. डॉ. सुधीर गायकवाड-इनामदार यांचे पुस्तक, तर डॉ. राजू कोसंबेकर यांच्या ई-बुकचे प्रकाशन केले जाईल. उद्घाटक म्हणून उपस्थित प्रमुख वक्ते डॉ. उल्हास राणे यांचे ‘शहरी पक्षांचे संवर्धन’ या विषयावर व्याख्यान होईल. डॉ. प्रकाश गोळे स्मृती व्याख्यानमालेत बीएनएचएसचे डॉ. दीपक आपटे यांचेही व्याख्यान होणार आहे.     

संमेलनाची नोंदणी गेले महिनाभरापासून सुरू असून संमेलनस्थळी आल्यानंतरही नागरिकांना नोंदणी करता येणार आहे.

उद्घाटनाविषयी :
दिवस : २५ व २६ नोव्हेंबर २०१७
वेळ : सकाळी ९.३० वाजता
स्थळ : गडकरी रंगायतन सभागृह, ठाणे
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link