Next
सर्वांत दीर्घ शीर्षकाचा मान मराठी पुस्तकाला; काव्यसंग्रहाची ‘गिनेस बुक’मध्ये नोंद
BOI
Monday, April 23 | 09:45 AM
15 0 0
Share this story

गिनेस बुकच्या प्रमाणपत्रासह रवी सोनार आणि कुटुंबीयसोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध नाव असलेले कवी रवी वसंत सोनार यांच्या काव्यसंग्रहाची ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नुकतीच नोंद झाली आहे. त्यांच्या ‘सखीसोबती.... क्षणवैविध्यांची गुंफण’ हा त्यांचा काव्यसंग्रह जगातील सर्वांत दीर्घ शीर्षक असलेला काव्यसंग्रह ठरला आहे. ‘दी लाँगेस्ट टायटल ऑफ ए बुक’ असे प्रमाणपत्र ‘गिनेस बुक’तर्फे अलीकडेच त्यांना देण्यात आले. याआधी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्, तसेच ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्येही या विक्रमाची नोंद झाली होती. या काव्यसंग्रहाच्या दीर्घ अशा अर्थपूर्ण शीर्षकामध्ये दोन हजार ५७ शब्द असून, सहा हजार ७६ अक्षरे आहेत. 

रवी सोनार यांनी ‘सखीसोबती... क्षणवैविध्यांची गुंफण’ या त्यांच्या नावीन्यपूर्ण अशा संमिश्र काव्यसंग्रहामध्ये आपल्या पत्नीला पाहायला गेल्यापासून लग्नाच्या अठराव्या वाढदिवसापर्यंतच्या कालावधीतील ठळक आणि महत्त्वपूर्ण अशा एकेका आठवणींचा आशय द्विपदी, क्षणिका, हायकू, चारोळी आणि प्रश्नांतिक त्रिवेणी या पाच काव्यात्मक साहित्यिक आकृतीबंधांमध्ये गुंफलेला आहे. त्यांचा हा प्रयोगही साहित्य क्षेत्रामध्ये दुर्मीळ आहे. विवाहपूर्व आणि विवाहोत्तर अशा मिळून एकूण ४१ प्रसंगांच्या आठवणींची काव्यगुंफण विश्वविक्रमवीर रवी सोनार यांनी यात केलेली आहे. हा काव्यसंग्रह लग्नाच्या अठराव्या वाढदिवसाला त्यांनी पत्नी सविता यांना भेट दिला. (रवी सोनार लोकांना विविध पुस्तके भेट देण्याचाही छंद असून, आजपर्यंत त्यांनी सुमारे साडेतीन ते चार हजार पुस्तके भेट दिली आहेत. त्या संदर्भातील बातमी वाचण्यासाठी https://goo.gl/FFnCvE येथे क्लिक करा.)

कवितांच्या या नावीन्यपूर्ण प्रयोगासाठी, तसेच त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शीर्षकासाठी या काव्यसंग्रहाला आतापर्यंत अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. आता ‘गिनेस बुक’मध्ये नोंद झाल्याने मराठी पुस्तकविश्वाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  

(रवी सोनार यांचा ‘सखीसोबती... क्षणवैविध्यांची गुंफण’ हा ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नोंद झालेला काव्यसंग्रह ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
जयंत ठेंगोडकर About 267 Days ago
मनःपूर्वक अभिनंदन ! keep it up ह्या शुभेच्छा !!
0
0

Select Language
Share Link