Next
‘बैजूज्’च्या स्टुडंट कनेक्ट सेंटरचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Wednesday, February 14 | 12:20 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘बैजूज्’ या भारतामधील शिक्षणक्षेत्रातील सर्वात मोठ्या आणि देशातील के-१२ अॅप सादर करणाऱ्या निर्मात्या कंपनीने, १३ फेब्रुवारी २०१८ रोजी पुण्यात ‘स्टुडंट कनेक्ट सेंटर’चे उद्घाटन केले.

अमर अविनाश कॉर्पोरेट प्लाझा, ११, बंड गार्डन रोड येथे ‘बैजूज्’चे पुण्यातील पहिले ‘स्टुडंट कनेक्ट सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना ‘बैजूज्’चे अध्यापन उपक्रम आणि वैयक्तिक वैशिष्ट्यांचा अनुभव देणाऱ्या अॅपचे परिणाम समजण्यास मदत होणार आहे. ‘बैजूज्’चे तज्ज्ञ हे अॅप कसे वापरायचे ते दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या घरी त्यांच्या सोयीनुसार जातील. यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी ०९२४३५ ००४५७ या क्रमांकावर फोन करून, सत्राचे आयोजन करायचे आहे. 

या सेंटरद्वारे ‘बैजूज्’ला या क्षेत्रात आपल्या नेटवर्कचा सखोल विस्तार करण्यासाठी पाठिंबा दिला जाईल. पुण्यातील या विशेष सेट-अपच्या उद्घाटनाद्वारे, महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांशी जोडले जाण्याचे ‘बैजूज्’चे ध्येय आहे. १४ लाख विद्यार्थ्यांसह ‘बैजूज्’चा महाराष्ट्रात सर्वात मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणारी सेंटर्स मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि सोलापूर आदी ठिकाणीही कार्यरत आहेत. याबरोबरच यवतमाळ, रत्नागिरी आणि हिंगोली यासारखी लहान शहरे आणि नगरांमध्येही अलिकडच्या महिन्यांत ‘बैजूज्’च्या कार्याला लोकांची पसंती लाभत आहे.

मृणाल मोहीत
बीवायजेयूच्या महाराष्ट्रातील विकासाबाबत, ‘बैजूज्’चे प्रमुख कार्यकारी अधिकारी मृणाल मोहीत म्हणाले, ‘आमच्या पहिल्या स्टुडंट कनेक्ट सेंटरचे पुण्यात उद्घाटन करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. केवळ पुण्यातून सव्वालाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना व आसपासच्या प्रदेशातील विद्यार्थ्यांना या केंद्रातून तज्ज्ञांमार्फत, अॅपच्या वैशिष्ट्यांचे सखोल आकलन होण्यास मदत होईल. येत्या काही महिन्यांमध्ये आम्ही पुण्यात आणखी सहा केंद्र सुरू करत आहोत. खरं तर, इतक्या मोठ्या प्रमाणावर मोठ्या आणि लहान शहरांमध्येही स्वीकृती मिळणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे. या प्रदेशातील विद्यार्थ्यांमध्ये या अॅपची स्वीकृती झाल्याने, ऑनलाइन अध्ययन प्रकाराला लोकप्रियता प्राप्त झाली आहे. येत्या काही वर्षांत या प्रदेशातील जास्तीत जास्त मुले डिजिटल अध्ययनात क्रांती घडवण्यासाठी सज्ज असतील.’
मृणाल पुढे म्हणाले, ‘प्रादेशिक भाषांमध्येही आमचे अॅप व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही सातत्याने नावीन्यपूर्ण पद्धतींचा शोध घेत आहोत. यामुळे महाराष्ट्रातील डिजिटल अध्ययानाच्या स्वीकृतीला प्रोत्साहन मिळणार आहे.’
भारताच्या वैयक्तिक के-१२ अॅपचे निर्माते ‘बैजूज्’ ही उत्तम शिक्षणासाठीची अग्रेसर संस्था आहे. तिच्याद्वारे विद्यार्थ्यांना स्वयंशिक्षण घेता येते. ‘बैजूज्’ची अध्ययनाची उत्पादने सगळ्या इयत्तांसाठी (चौथी ते बारावी) शिक्षण देतात. यात स्पर्धात्मक परीक्षांसाठी चाचणी तयारी अभ्यासक्रमही चालवला जातो. अलिकडेच उद्घाटन करण्यात आलेल्या ‘पॅरेंट कनेक्ट’ अॅपमुळे पालकांना आपल्या पाल्याची प्रगती वेळोवेळी कळण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या पाल्याचे कौतुक करता येतेच, शिवाय त्यांच्या या अध्ययनाच्या प्रवासात पाठिंबा देण्याची भूमिका उत्तमप्रकारे बजावता येते.
वैयक्तिक स्तरावरील शिक्षण पुढील स्तरावर नेण्यासाठी, ‘बैजूज्’ने बिग डेटा अॅनालिसिसचा लाभ घेतला आहे. परिणामकारक अध्ययनासाठी अॅपद्वारे, वैयक्तिक स्तरावर विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवास निर्माण करण्यात आला आहे. हा मार्ग अधिक लाभदायक असेल, शिवाय विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या क्षमतेचा आणि स्टाइलचा असेल, त्यासाठी मदत करणारा असेल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link