Next
डेंग्यूसंदर्भात जनजागृती कार्यक्रम
BOI
Wednesday, August 07, 2019 | 06:15 PM
15 0 0
Share this article:


पुणे : येथील एस. एम. जोशी महाविद्यालयात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या मोसमात पसणाऱ्या डेंग्यू या साथीच्या आजाराविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वैद्यकीय अधिकारी दिनेश बेंडे यांनी विद्यार्थ्यांना डेंग्यूची लक्षणे, उपचार आणि पूर्वकाळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. 

‘डेंग्यू, हिवताप, चिकनगुनिया या आजारांपासून बचाव हा सर्वांच्या सहकार्यानेच होऊ शकतो. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी यामध्ये सहभागी व्हावे. घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, डास प्रतिरोधक मलम लावावा, डासांना घालवण्यासाठी धूप, उदबत्त्या, गुडनाईट यांसारख्या प्रतिरोधकांचा वापर करावा. लांब बाह्यांचे कपडे घालावेत. झोपताना मच्छरदाणी वापरावी. साठलेल्या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा करावा’, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बेंडे यांनी केले.

या कार्यक्रमात जनजागृतीपर बोलताना बेंडे पुढे म्हणाले,  ‘डासांची पैदास होणारी ठिकाणे व भंगार साहित्याची विल्हेवाट लावावी. घरातील पाण्याच्या टाक्यांना नीट झाकण बसवावे. घरातील पाण्याची भांडी आठवड्यातून किमान एकदा घासून-पुसून कोरडी करावीत. मोठ्या पाणी साठ्यांमध्ये गप्पी मासे सोडावेत. याबरोबरच डेंग्यू, हिवताप, चिकनगुनिया या आजारांची लागण झालेल्या रुग्णांची माहिती महानगरपालिकेला कळवावी.’

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनीदेखील या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक पांढरबळे यांनी केले. उपप्राचार्य डॉ. महादेव जरे यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास अनंता बांदल, निलांबर खरात, प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रंजना खरात यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search