Next
‘भारतीय विचार जगात महत्त्वाचा ठरेल’
डॉ. एन. एस. उमराणी यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Wednesday, January 23, 2019 | 01:35 PM
15 0 0
Share this article:



पुणे : ‘स्वामीजींच्या विचारांचे आंतरराष्ट्रीय पडसाद पुढे आणणारा हा शोधनिबंध महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज आहे. त्याच्या भाषांतरासाठी पुणे विद्यापीठ निधी उपलब्ध करून देईल. भौतिकवादाचा भस्मासूर फोफावत असताना भारतीय विचार जगात महत्त्वाचा ठरणार आहे,’ असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी केले.

ज्येष्ठ अभ्यासक आणि विलासपूर येथील गुरू घसिदास विद्यापीठाचे कुलपती डॉ. अशोक मोडक संशोधित ‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावरील शोधनिबंध पुस्तिकेचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. उमराणी यांच्या हस्ते १९ जानेवारी २०१९ रोजी झाले. त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम गरवारे कॉमर्स कॉलेजच्या सावरकर सभागृहात झाला. संशोधन-ज्ञान-विचार प्रतिष्ठानच्या डॉ. श्रीपती शास्त्री रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  
 
डॉ. मोडक म्हणाले, ‘रशियात सध्या मांडणी होत असलेला राष्ट्रवाद आणि भारतातील सांस्कृतिक राष्ट्रवाद यात नाते आहे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची मोहिनी टॉल्स्टॉय आणि अनेक रशियन प्राच्यविद्या अभ्यासकांवर होती. स्वामी विवेकानंद हे समाजवादी होते, अशी मांडणी  भारतात आणि भारताबाहेर केली जाते. ती निराधार आणि विकृत आहे.’

या प्रसंगी पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश कुलकर्णी, डॉ शरद खरे, डॉ. शरद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. संशोधन-ज्ञान-विचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. राजश्री देशपांडे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search