Next
‘रॉस फाउंडेशन’च्या महाराष्ट्र शाखेची पुण्यात स्थापना
प्रेस रिलीज
Wednesday, October 24, 2018 | 04:47 PM
15 0 0
Share this article:

पुणे : जागतिक पॅलेटिव्ह केअर डेचे औचित्य साधून एलिझाबेथ क्युब्लेर रॉस फाउंडेशनतर्फे (ईकेआरएफ) महाराष्ट्र शाखेची पुण्यात स्थापना करण्यात आली. या शाखेचे नेतृत्व वरिष्ठ पॅलेटिव्ह केअर फिजिशियन डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी करणार आहेत.

‘ईकेआरएफ’ ही अमेरिकास्थित आंतरराष्ट्रीय धर्मादाय संस्था असून, स्वित्झर्लंडच्या मानसोपचारतज्ञ व पॅलेटिव्ह केअर या विषयांत महत्त्वाचे काम केलेल्या डॉ. एलिझाबेथ क्युब्लेर रॉस यांच्या कार्याने ही संस्था प्रेरित आहे. त्या ‘डेथ आणि डाइंग’  (१९६९) या लोकप्रिय पुस्तकाच्या लेखिका म्हणून परिचित होत्या.
डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, ‘ईकेआरएफ या संस्थेने आपल्यावर काम करण्याची जबाबदारी दिली ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. डॉ. एलिझाबेथ क्युब्लेर रॉस यांचा वारसा, यांचे काम भारतात पसरविणे ही माझ्यावर एक मोठी जबाबदारी असून, ती पार पाडण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन.’

‘डॉ. क्युब्लेर रॉस यांनी ‘डेथ आणि डाइंग’ या पुस्तकात मृत्युशय्येवर असलेल्या व्यक्तींच्या इच्छा आणि अपेक्षा समजून घेणे आणि त्यांच्या मनाचा आदर करणे याकडे लक्ष वेधले आहे. पुस्तकाच्या रूपाने मांडलेल्या विचारांना क्युब्लेर रॉस मॉडेल म्हणून ओळखले जाते. मृत्यु स्विकारणारी आपली संस्कृती असली, तरी या विषयावर समाजात मोकळेपणाने बोलले जात नाही. पॅलेटिव्ह केअर फिजिशियन म्हणून मी अनेक दुर्धर आजारी रुग्णांच्या नातेवाईकांशी जेव्हा बोलते त्यावेळी ते कोणत्याही परिस्थितीत आमच्या नातेवाईकाला बरे करा अशी विनवणी डॉक्टरांना करतात. अशा रूग्णाच्या वैद्यकीय परिस्थितीविषयी वैद्यकीय तज्ञ, रुग्ण आणि नातेवाईक यांच्यामध्ये मोकळेपणाने चर्चा झाल्यास रूग्णाला होणारा अनावश्यक त्रास, हाल टाळता येऊ शकतात,’ असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

‘ईकेआरएफ महाराष्ट्र इंडिया’शाखेतर्फे ‘ई ईज अँड सपोर्ट’ या डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी स्थापित केलेल्या संस्थेच्या माध्यमातून काम केले जाईल.

‘ईकेआरएफ’चे संस्थापक अध्यक्ष आणि डॉ. क्युब्लेर रॉस यांचे चिरंजीव केन रॉस म्हणाले, ‘महाराष्ट्र शाखा सुरू करणे हे अनेक देशातील विविध समाज घटकापर्यंत पोहोचण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. त्यासाठी संस्था निश्चितच प्रयत्नशील राहील.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search