Next
महालक्ष्मी मंदिर, बाणगंगा मंदिर परिसराचा होणार कायापालट
पालकमंत्री देसाई यांनी घेतला प्रस्तावित सुधारणांचा आढावा
प्रेस रिलीज
Wednesday, June 12, 2019 | 03:28 PM
15 0 0
Share this article:

महालक्ष्मी मंदिरमुंबई : मुंबईतील सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर, तसेच बाणगंगा मंदिर परिसराचा कायापालट केला जाणार आहे. या संदर्भात उद्योगमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंत्रालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली. या वेळी मंदिर परिसरातील प्रस्तावित सुधारणांचा आढावा घेण्यात आला.

महालक्ष्मी मंदिर परिसरात दररोज दहा हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात, नवरात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांची संख्या लाखापलीकडे असते. त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. भाविकांसाठी सभागृह, प्रतीक्षा दालन उभारणे, चप्पल स्टँड, सरकते जिने बसविणे, अतिक्रमण रोखण्यासाठी कुंपन भिंत मजबूत करणे, मंदिरात जाण्यासाठी असलेला मार्ग प्रशस्त करणे, या शिवाय किनारपट्टीकडील भागात रस्ता करण्यासाठी कोस्टलरोड प्रशासनास आवाहन करणे, मंदिरात येणाऱ्या भाविकांना देवीच्या दर्शनासाठी प्रवेश व बाहेर पडण्यासाठी रस्ता तयार करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. 

बाणगंगा मंदिरकिनाऱ्यालगतच्या पात्र झोपड्यांचे स्थलांतर करण्यावरही या वेळी चर्चा झालीली. मंदिर परिसरातील दुकाने एका रांगेत आणण्याचे काम हाती घेण्यात आले असून, यासाठी मुंबई महापालिका निधी उपलब्ध करून देणार आहे. सध्याच्या प्रसाधनगृहांची पुनर्बांधणी करण्याचे विश्वस्त संस्थेने मान्य केले. या शिवाय बाणगंगा देवस्थान परिसरातील अतिक्रमणे पुरातत्व विभाग, महापालिका, पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या मदतीने काढण्याच्या सूचना या वेळी करण्यात आल्या. या पुढील काळात अतिक्रमण होऊ नयेत, यासाठी पुरातत्व विभागाने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे या वेळी सूचवण्यात आले.

बाणगंगा हे तिर्थाटन असल्याने मंदिराचा जिर्णोद्धार करून संरक्षक भिंत, रस्ते, साफसफाईचे काम हाती घेण्याच्या सूचना या वेळी करण्यात आल्या. या शिवाय बाणगंगा तलावातील पाण्याचे शुद्धीकरण केले जाणार आहे. त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. बाणगंगा तलाव परिसरात अतिक्रमण झालेल्या झोपड्यांमधील अवैध वीज जोडण्या बेस्टने रद्द करणे, आरपीजी फाउंडेशनतर्फे या भागाचे सौंदर्यीकरण करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली.

या वेळी मुंबई महापालिकेचे अधिकारी, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, पुरातत्व विभागाचे अधिकारी, वारसा वास्तू संवर्धन क्षेत्रातील जाणकार वास्तूतज्ज्ञ आभा लांबा तसेच बाणगंगा आणि महालक्ष्मी मंदिर विश्वस्त संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search