Next
‘लिटल बडी किंडर गार्टेन’चा पुण्यात प्रवेश
प्रेस रिलीज
Thursday, July 26, 2018 | 04:57 PM
15 0 0
Share this story

‘लिटल बडी किंडरगार्टन’बाबत माहिती देताना संस्थेच्या संस्थापक आणि संचालक रम्या गंगाधरन
पुणे : बालवयातील शिक्षणाला सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झाले आहे. युके अर्ली इअर्स फाउंडेशन स्टेज या संस्थेकडून प्रेरणा घेऊन तयार केलेल्या अभ्यासक्रमाच्या आधारावर काम करणारी ‘लिटल बडी किंडर गार्टेन’ ही संस्था आता पुण्यात लवकरच पदार्पण करत आहे.

या वेळी लिटल बडी किंडर गार्टेनच्या मार्गदर्शक व शिक्षणतज्ञ मंजुळा रामन म्हणाल्या, ‘सहा वर्षावरील बालकांना शैक्षणिक कौशल्यांमध्ये पुढील आयुष्यात समस्या येत असल्याचे एनसीबीआयच्या अभ्यासातून पुढे आले आहे. त्यामुळेच लिटल बडीच्या अभ्यासक्रमात विकासात्मक,संशोधनात्मक आणि कस्टमाईज्ड अशा अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. आमच्या शिक्षकांना ब्रिटिश कौन्सिल सर्टिफाईड प्रशिक्षकांकडून तसेच, युकेतील इवायएफएस तज्ञांकडून प्रशिक्षण दिले जाते.

लिटल बडीच्या लर्निंग व डेव्हलपमेंट विभागाच्या संचालिका रम्या गंगाधरन म्हणाल्या, ‘बालकांच्या समग्र विकासावर आम्ही लक्ष केंद्रित करत असून, त्यांच्यातील नैसर्गिक कौशल्ये व त्यांची उत्सुकता यांचा कौशल्याशी मेळ घालून त्यांना योग्य बाबतीत प्रशिक्षण देण्यासाठीचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे या बालकांचा सामाजिक विकास, भाषा विकास, सर्जनशील विकास, तसेच कल्पकता, शारीरिक क्षमता व गणित या विषयातील त्यांची क्षमता याबाबतीत त्यांना फायदा होतो.

रम्या गंगाधरन पुढे म्हणाल्या, ‘कर्नाटकानंतर महाराष्ट्रात विदर्भ (नागपूर व अमरावती विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग),खान्देश व उत्तर महाराष्ट्र (नाशिक विभाग) व कोकण  विभागात विस्तार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आमच्या अभिनव अशा सर्वांगीण फ्रँचायजी मॉडेलमध्ये फ्रँचायजी ब्रँड चांगल्या प्रकारे उभी करण्याबरोबरच तेथे पायाभूत सुविधा निर्माण करणे, युकेतील सर्टिफाईड प्रशिक्षकांकडून येथील शिक्षकांना प्रशिक्षण देणे, संपूर्ण वर्षभरासाठी प्रशिक्षण व विविध कामकाजासाठी सहकार्य करणे, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम तयार करणे, शिक्षक व पालकांसाठी कार्यशाळा घेणे, तसेच, ब्रँडिंग व मार्केटिंग तसेच माहिती तंत्रज्ञानासाठी साहाय्य करणे अशा गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. आमच्या मॉडेलच्या माध्यमातून फ्रँचायजींना गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळेल याची आम्हाला खात्री आहे. या आर्थिक वर्षात महाराष्ट्र, कर्नाटक, ओडीसा आणि आंध्रप्रदेशमध्ये मिळून ५० फ्रँचायजी शाखा स्थापन करण्याचे आमचे लक्ष्य आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link