Next
‘पीएनजी अँड सन्स’मध्ये गणपतीच्या विविध रूपांचे चित्रप्रदर्शन
प्रेस रिलीज
Monday, September 17 | 03:03 PM
15 0 0
Share this story

कराडच्या सागर बोंद्रे यांनी रेखाटलेले गणपतीचे चित्र.पुणे : पु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्हअंतर्गत गणेशोत्सवानिमित्त ‘आधी वंदू तूज मोरया’ हे गणपतीच्या विविध रूपांचे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या औंध, कोथरूड, चिंचवड येथील शाखांमध्ये २२ सप्टेंबर २०१८ पर्यंत (सोमवार बंद) सकाळी ११ ते रात्री आठ या वेळेत पाहता येणार आहे.

कलाकारांनी विविध कल्पनांतून साकारलेली गणपतीची दीडशेहून अधिक मूर्त, अमूर्त रूपे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. वुमन आर्टिस्ट ग्रुपच्या चाळीस कलाकारांनी काढलेल्या गणपतीच्या चित्रांचे प्रदर्शन कोथरूडमधील हॅपी कॉलनी, औंधमधील वेस्टंड सेंटर वनमधील तसेच, कराडचे सागर बोंद्रे यांनी साकरलेल्या गणपतीच्या रूपांचे प्रदर्शन चापेकर चौकाजवळील गोखले वृंदावनमधील पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.च्या कलादालनात भरविले आहे. वॉटर कलर ऑन पेपर, अॅक्रिलिक ऑन कॅन्व्हासवर विविध रंगाचा वापर करून गणपतीची साकारलेली चित्रे मनोहारी आहेत.  

प्रदर्शनाविषयी :
कालावधी :
२२ सप्टेंबर २०१८ पर्यंत (सोमवार बंद),
वेळ : सकाळी ११ ते रात्री आठ.
स्थळ : औंध : पु. ना. गाडगीळ आणि सन्स औंध, वेस्टंड सेंटर वन, परिहार चौकाजवळ.
कोथरूड : पु. ना. गाडगीळ आणि सन्स हॅपी कॉलनी, कर्वे रस्ता, कोथरूड, पुणे.
चिंचवड : पु. ना. गाडगीळ आणि सन्स चिंचवड, गोखले वृंदावन, चापेकर चौकाजवळ
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link