Next
जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त जनजागृती मोहीम
एम. ए. रंगूनवाला दंत रुग्णालयाचा उपक्रम
प्रेस रिलीज
Friday, May 31, 2019 | 04:54 PM
15 0 0
Share this article:

पुणे : जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त ३१ मे २०१९ रोजी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या एम. ए. रंगूनवाला दंत रुग्णालयातर्फे    जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली होती.

आझम कॅम्पस (पुणे कॅम्प) येथे हा कार्यक्रम झाला. २५ ते ३१ मे या कालावधीत तंबाखूविरोधी जनजागरण सप्ताह साजरा करण्यात आला. यात व्याख्यांने, विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आज (३१ मे) या सप्ताहाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रंगूनवाला दंत महाविद्यालयाचे रजिस्ट्रार ए. आर. शेख अध्यक्षस्थानी यांनी भूषविले. डॉ. अमिता आदित्य, डॉ. रेणुका नगराळे यांनी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम, व्यसनमुक्तीचे उपाय यांबाबत मार्गदर्शन केले.


डॉ. विनोद व्ही. सी. यांनी रंगूनवाला दंत महाविद्यालयातील तंबाखू व्यसनमुक्ती केंद्राच्या कार्याची माहिती दिली. जनजागृती उपक्रमातील यशस्वी विद्यार्थी, विद्यार्थिनींना डॉ. अमिता आदित्य, डॉ. रेणुका नागराळे, दीपक बीडकर यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search