Next
कपिल देव पुन्हा एकदा मैदानावर..
भारतीय गोल्फ संघात निवड
BOI
Monday, July 30, 2018 | 05:07 PM
15 0 0
Share this story

कपिल देव

भारताला क्रिकेटचा पहिलावहिला विश्वचषक मिळवून देण्याचा मान पटकावणारे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव पुन्हा एकदा मैदानावर उतरण्याच्या तयारीत आहेत. परंतु आता ते क्रिकेटसाठी नाही, तर क्रिकेटनंतर त्यांचा आवडता खेळ असलेल्या ‘गोल्फ’साठी मैदानावर पुनरागमन करत आहेत. ‘एशिया पॅसिफिक सीनिअर २०१८’ स्पर्धेसाठी त्यांची भारतीय संघात निवड झाली आहे.

१७ ते १९ ऑक्टोबरदरम्यान जपानमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी अमित लुथरा, रिशी नरिन यांचीही कपिल देव यांच्यासोबत संघात निवड करण्यात आली आहे. ५५ वर्षे वयाच्या पुढील खेळाडूंसाठी ‘एशिया पॅसिफिक सीनिअर’ स्पर्धा आयोजित करण्यात येते. क्रिकेट या खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर कपिल देव यांनी गोल्फ खेळण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले होते. बराच काळ ते हा खेळ खेळले आहेत. दिल्ली गोल्फ क्लबमध्ये ते अनेकदा गोल्फचा सराव करताना दिसतात. 

‘क्रिकेटव्यतिरिक्त इतर कोणत्या खेळासाठी भारताचे प्रतिनिधित्व करीन, असे वाटले नव्हते. परंतु गोल्फ या खेळाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ही संधी माझ्यासाठी चालून आली आहे, याचा मला एक खेळाडू या नात्याने खूप आनंद होत आहे,’ अशा शब्दांत कपिल देव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. क्रिकेटसारख्या जगभर लोकप्रिय असलेल्या खेळात भारताची मान अभिमानाने उंचावेल अशी कामगिरी केलेले कपिल देव आता गोल्फ खेळात अशीच खेळी खेळतील का, हे पाहण्यासाठी अवघा भारत उत्सुक असेल...  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link