Next
पूरग्रस्तांना कलाकारांचाही मदतीचा हात
नाट्यपरिषदेच्या शाखांमध्ये मदत केंद्रे
BOI
Monday, August 12, 2019 | 06:16 PM
15 0 0
Share this article:


पुणे : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी कलाकारही पुढे सरसावले असून, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या वतीने मदत जमा करण्यात येत आहे. पुण्यात जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्रात १४ ऑगस्टपर्यंत मदत जमा करण्यात येणार आहे.  
  
‘कलाकारही आपल्या परीने मदत करत असून, नागरिकांनीही यात सहभाग घ्यावा,’ असे आवाहन अभिनेता सुबोध भावे, पुष्कर श्रोत्री, मृण्मयी देशपांडे यांनी  केले. या वेळी महापौर मुक्ता टिळक, मेघराज राजेभोसले आदी उपस्थित होते. 

याबाबत माहिती देताना सुबोध भावे म्हणाले, ‘पूरग्रस्त नागरिकांना आम्ही हा विश्वास देऊ इच्छितो की, तुम्ही एकटे नाही आहात. फक्त कलाकारच नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याबरोबर आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या संकटातून बाहेर पडाल. आमचेही महाराष्ट्रावर प्रेम आहे. त्यामुळे आमचे उत्तरदायित्व म्हणून आम्ही एकत्र येऊन मदत करत आहोत. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आदी सात ठिकाणी नाट्यपरिषदेच्या शाखांमध्ये मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. कोल्हापूर, सांगलीसह कोकणातील गावांनाही ही मदत पाठवण्यात येणार आहे.’
  
‘अशा भयावह संकटांवर मात करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. आगामी काळात अशी आपत्ती ओढवू नये त्यासाठी नियोजन केले पाहिजे,’ असे मत मृण्मयी देशपांडे हिने व्यक्त केले. 

(सुबोध भावे, मृण्मयी देशपांडे यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search