Next
‘महाबँके’तर्फे मराठे आणि गुप्ता यांना पुन्हा अधिकार बहाल
प्रेस रिलीज
Monday, November 05, 2018 | 03:07 PM
15 0 0
Share this article:

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालक मंडळाने दोन नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे आणि कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता यांचे कार्यकारी अधिकार पुन्हा बहाल केले आहेत.

संचालक मंडळाच्या जून महिन्यात झालेल्या बैठकीत २९ जून २०१८पासून मराठे आणि गुप्ता या दोघांना त्यांच्या कार्यशील जबाबदार्‍यांपासून परावृत्त केले होते. मराठे यांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून, तर गुप्ता यांचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांचे कार्यशील अधिकार संचालक मंडळाद्वारे पुनर्संचयित करण्याची बाब बँकेसाठी स्वागतार्ह असून, या आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीमध्ये बँकेने देखील गेल्या १० तिमाहीनंतर चांगले आर्थिक परिणाम दाखवले आहेत.

कार्यशील अधिकारांचे पुनर्संचयन करण्यामुळे केवळ बँक ऑफ महाराष्ट्रमधील नाही, तर एकूणच देशातील बँकिंग वर्तुळामधील सर्वांचेच मनोबल वाढणार असल्याचे बँकेकडून स्पष्ट करण्यात आले.

जनधन योजना, मुद्रा, सामाजिक सुरक्षा योजना यांसारख्या शासकीय योजनांच्या सादरीकरणामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र नेहमीच अव्वल राहिली आहे. या निर्णयाचा सखोल आणि गहन परिणाम बँकेच्या दैनंदिन कामकाजावर सकारात्मक होणार असून, त्याचे पडसाद लाभप्रदता-नफ्यामध्ये वाढ आणि विकासावर होणार आहे.   
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search