Next
उष्णतेच्या लाटेचा इशारा; अशी घ्या काळजी
BOI
Wednesday, April 03, 2019 | 02:03 PM
15 0 0
Share this article:


पुणे : मार्च महिन्याच्या अखेरीपासूनच तापमानाचा पारा चाळिशीच्या पुढे गेल्याने उन्हाचा तडाखा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

या गोष्टी आवर्जून करा : 

- भरपूर पाणी, घरी केलेले ताक, फळांचे रस, सरबते, शहाळ्याचे पाणी प्यावे.
- कामासाठी बाहेर जाणाऱ्यांनी अंगाला सनस्क्रीन लावावे. 
- हॅट, स्कार्फ, गॉगल यांचा वापर करावा.
- डोळे गार पाण्याने धुवावेत.
- बाजारातील बाटलीबंद थंड पेये पिऊ नयेत.
- उघड्यावरील बर्फ, फळे खाऊ नयेत.

लहान मुलांची घ्या विशेष काळजी 

उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे लहान मुलांमध्ये कांजिण्या, गोवर, गालगुंड यांची साथ पसरते. त्यामुळे लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी मुलांनी उन्हाळ्यात भरपूर पाणी, घरी केलेली सरबते, फळांचे रस पिणे आवश्यक आहे. मुलांना बाहेर उघड्यावर कापलेली फळे, बर्फ खाण्यास देऊ नये.  

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search