Next
नेत्रसेवा प्रतिष्ठानतर्फे आगळेवेगळे ‘गौरीपूजन’
मुलींमधील तिरळेपणावर मोफत उपचार
BOI
Monday, September 09, 2019 | 12:29 PM
15 0 0
Share this article:

तिरळेपणा असलेल्या मुलीची नेत्रतपासणी करताना, ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. मधुसूदन झंवर. समवेत डॉ. ओमप्रकाश पेठे, डॉ. मनोहर शेठ, डॉ सतीश देसाई आदी.

पुणे : तिरळेपणातून निर्माण होणाऱ्या समस्या, न्यूनगंडातून मुलींची सुटका करण्यासाठी आणि त्यांना नवे आत्मविश्वासपूर्ण जीवन देण्यासाठी ‘पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान’ने अनेक मुलींवर मोफत उपचार करून, आगळ्यावेगळ्या पद्धतीने ‘गौरीपूजन’ साजरे केले. या उपक्रमातून मुलींनाच गौर मानून त्यांचे सक्षमीकरण करून, एक नवा आदर्श नेत्रसेवा प्रतिष्ठानने ठेवला आहे.  

रविवारी, आठ सप्टेंबर रोजी सारसबागेजवळ असलेल्या हरजीवन हॉस्पिटलमध्ये आयोजित या शिबिराला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. मुलींसह २१० जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. मुलींव्यतिरिक्त लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांवरदेखील उपचार करण्यात आले. ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. मधुसूदन झंवर यांच्या नेतृत्वाखाली दहा नेत्रतज्ज्ञांचे पथक या शिबिरात सहभागी झाले होते. 

गौरी-गणपती पाहण्यासाठी राज्यभरातून पुण्यात येणाऱ्यांचे वाढते प्रमाण पाहता यापुढे गणेशोत्सवाच्या काळातच दर वर्षी हे शिबिर आयोजित केले जाणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. 

‘लायन्स क्लब’चे प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश पेठे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले. हरजीवन हॉस्पिटलचे डॉ. मनोहर शेठ या वेळी उपस्थित होते.

‘‘पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान’तर्फे गेली ३५ वर्षे तिरळेपणावर मोफत उपचार करण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून, आतापर्यंत राज्याच्या २३ जिल्ह्यांमध्ये शिबिरे घेण्यात आली आहेत. २५ हजारांहून अधिक रुग्णांनी त्याचा लाभ घेतला असून, तिरळेपणाच्या वैगुण्यातून सुटका होऊन  आत्मविश्वासपूर्ण जीवन जगायला सुरुवात केली आहे,’ असे डॉ. सतीश देसाई यांनी या वेळी सांगितले. 

डॉ. राजेश पवार यांनी आभार मानले. या वेळी डॉ. संपत पुंगलिया, रवी चौधरी, डॉ. पारस शहा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search