Next
‘सिअमा’तर्फे व्यावसायिक प्रदर्शनाचे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, January 30, 2019 | 12:29 PM
15 0 0
Share this article:

पुणे : कन्सल्टिंग इलेक्ट्रिकल इंजिनीअर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (सीअमा) यांच्या वतीने आठ, नऊ आणि १० फेब्रुवारी २०१९ या कालावधीत ‘सीअमाटेक २०१९’ या व्यावसायिक प्रदर्शनाचे आयोजन चिंचवडमधील ऑटो क्लस्टर येथे करण्यात आले आहे.

‘सीअमा’ची स्थापना २००४ साली कन्सल्टिंग इलेक्ट्रिक इंजिनीअर्स प्रातिनिधिक स्वरूपाचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने असून, याद्वारे आपल्या सभासदांसाठी शैक्षणिकदृष्ट्या कार्यशाळा, औद्योगिक सहल, चर्चासत्र व केस स्टडीच्या माध्यमातून सत्रे आयोजित केली जातात. त्यामुळे सदस्याच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागतो. ‘सीअमा’चे सदस्य इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीच्या विविध उपशाखेत काम करतात.

‘सीअमा’ हे वस्तू उत्पादक व सल्लागार यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून, आजच्या आधुनिक औद्योगीकरणात ती महत्त्वाची भूमिका बजावते. इलेक्ट्रिक अभियांत्रिकी उपकरणांचे उत्पादक ‘सीअमा’चे नोंदणीकृत सदस्य आहेत आणि जे इलेक्ट्रिकल अभियंते सदस्य नाहीत त्यांना सौरक्षक प्रवर्गातून नोंदणी करता येऊ शकते.या विषयी बोलताना ‘सीअमा’चे अध्यक्ष अनिल भंडारी म्हणाले, ‘‘सीअमाटेक २०१७’च्या यशस्वी वाटचालीनंतर या वर्षी ‘सीअमाटेक २०१९’ घोषित करताना आम्हाला आनंद होत आहे. या प्रदर्शनाची सुरुवात आठ फेब्रुवारीपासून होत आहे. हे प्रदर्शन इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग उत्पादक व व्यापारी यांच्यासाठी त्यांची उत्पादने व तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. वेगवेगळ्या प्रवर्गातील उपलब्ध उत्पादने आणि त्यासाठी वापरलेल्या तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी ही प्रदर्शनी उदाहरणासहित आपल्याला पाहायला मिळणार आहे. तीन दिवसांसाठी असलेली ही प्रदर्शनी तरुण अभियंत्यासाठी एक पर्वणीच असून या दिन दिवसांत इलेक्ट्रिक सुरक्षितता, इलेक्ट्रिकल अपघात व उपकरणांची निगा कशी, कुठे आणि कधी करावी या संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.’

या प्रदर्शनामध्ये एबीबी इंडिया लिमिटेड, पॉलीकॅब वायर्स प्रायव्हेट लिमिटेड, आरआर केबल्स, स्टर्लिंग अँड विल्सन, सीअँडएस इलेक्ट्रिक लिमिटेड, डेल्टा इंडिया इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, जिंदाल रेक्टिफायर्स, लॅप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सक्सेस इंजिनीअर्स आदी नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search