Next
का. र. मित्र
BOI
Thursday, November 02 | 04:00 AM
15 1 0
Share this story

आज मराठीत गौरवशाली दिवाळी अंकांची जी परंपरा सुरू आहे, त्याची १९०९ साली ‘मासिक मनोरंजन’चा पहिला मराठी दिवाळी अंक प्रसिद्ध करून मुहूर्तमेढ रोवणारे काशिनाथ रघुनाथ आजगावकर ऊर्फ का. र. मित्र यांचा दोन नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
............

दोन नोव्हेंबर १८७१ रोजी आजगावमध्ये जन्मलेल्या काशिनाथ रघुनाथ आजगावकर यांना बंगाली भाषा उत्तम येत होती आणि बंगाली संस्कृतीची चांगली माहिती होती. ते बंगाली साहित्याचे अनुवादक होते. त्यांनी १८९५ साली ‘मासिक मनोरंजन’ सुरू केलं आणि पुढे १९०९ साली ‘मासिक मनोरंजन’चा पहिला मराठी दिवाळी अंक काढला होता. त्यांनी मुद्दाम बंगाली वाटणारं असं ‘मित्र’ हे आडनाव घेतलं होतं आणि त्याच आडनावाने ते पुढे ओळखले गेले. 

इंग्लिश मासिकांचा ख्रिसमस स्पेशल दिवाळी अंक असतो, तसाच मराठीत असावा आणि बंगाली संस्कृतीतही तशी परंपरा होती म्हणून त्यांनी मराठीत दिवाळी अंक काढायचं ठरवलं  आणि १९३५पर्यंत नेटाने तो अंक चालू ठेवला. 

त्यांनी कविता, गोष्टी, कादंबऱ्या, विनोद, अध्यात्म, साहित्य समालोचन, काव्यचर्चा अशा विविध प्रकारचा मजकूर ‘मासिक मनोरंजन’मधून प्रसिद्ध करायला सुरुवात केली होती. राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, केशवसुत, काशीबाई कानिटकर, वा. व. पटवर्धन, गो. चिं. भाटे असे अनेक साहित्यिक त्यांनी जोडले होते. 

वंगजागृति, धाकट्या सूनबाई, मृणालिनी, प्रियंवदा, लक्ष्मणमूर्च्छा, रामविलाप, गरीब बिचारी यमुना, ही रामाची अयोध्या, बाळंतपण असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

२३ जून १९२० रोजी त्यांचं मुंबईत निधन झालं.
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Anjali kirtane About 346 Days ago
A great person. He was a Pioneer. We should not forget him.
0
0
Seema M. Goray About 346 Days ago
It's very sad to see this glorious literary tradition of Diwali And on it's almost last leg.In my childhood I used eagarly await this an that my mother used to bring.My humble Namskar to Shri Mitra for pioneering this tradition
1
0

Select Language
Share Link