Next
कवितांचा श्रावण... श्रावणाच्या कविता!
BOI
Monday, July 24, 2017 | 05:11 PM
15 3 0
Share this article:


...आणि म्हणता म्हणता तो आला... शेतशिवाराला चिंब करणारा, झाडा-फुलांना बहरून टाकणारा, पशु-पक्ष्यांना सुखावणारा, मनामनांना फुलवणारा, चित्तवृत्ती उल्हसित करणारा, अवघ्या चराचरालाच नवं रूपडं देणारा...तो...श्रावण आला... सृजनाचा अनोखा आविष्कार असलेल्या या महिन्याचं आणि कवितांचं एक वेगळंच नातं आहे. हे लक्षात घेऊन पाऊस, निसर्ग-पर्यावरण, शेती अशा विषयांशी निगडित असलेली एक कविता आजपासून महिनाभर दररोज ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध केली जाणार आहे. सुरुवात करू या बालकवींच्या ‘श्रावणमास’ कवितेपासून...
............
श्रावण म्हणजे जीवनाच्या आनंदयात्रेतला एक उत्सवच जणू. ज्येष्ठ-आषाढात दमदार कोसळणारा पाऊस श्रावणात थोडा रमत-गमत, उन्हाशी लपंडाव खेळतच बरसतो. जणू काही दोन महिन्यांच्या अविरत परिश्रमांनंतरची थोडी विश्रांतीच! या काळातच सृष्टी बहरते आणि नवे रूप लेवून सजते...या वेळी अवनी धारण करत असते निसर्गदत्त सौंदर्याचा आविष्कार...आणि आकाशही त्याला अपवाद नसतं...कारण ऊन-पावसाच्या खेळातूनच नभात साकारतं सप्तरंगी इंद्रधनू...साहजिकच सारा आसमंतच मोहरून जातो आणि आपल्या जगण्याचं अवकाशही...नवा उत्साह मिळतो आपल्याला...अन् जगण्याची उमेदही...रिफ्रेश करून टाकतो हा माहौल...शहरातल्या गर्दीत कदाचित हे सारंच्या सारं नसेल मिळत अनुभवायला...पण श्रावणाचा ‘फील’ तरी नक्कीच अनुभवता येतो...अशा या उत्सवाच्या नाटकाचा पडदा आज वर जातोय...पुढचे काही दिवस पाहायला मिळेल त्याचं सुंदर नेपथ्य...आणि आपल्या जीवनाच्या नाट्याला मिळेल एक मस्त कलाटणी! 

सृजनाचा अनोखा आविष्कार असलेल्या या महिन्याचं आणि कवितांचं एक वेगळंच नातं आहे. हे लक्षात घेऊन पाऊस, निसर्ग-पर्यावरण, शेती अशा विषयांशी निगडित असलेली एक कविता आजपासून दररोज ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध केली जाणार आहे. सुरुवात अर्थातच बालकवींच्याश्रावणमास’ कवितेपासून...


श्रावणमास

श्रावणमासीं हर्ष मानसीं, हिरवळ दाटे चोंहिकडे;
क्षणांत येतें सरसर शिरवें, क्षणांत फिरुनी ऊन पडे.

वरतीं बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे, 
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपीं कुणी भासे!

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा! तों उघडे;
तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळें पिवळें ऊन पडे. 

उठती वरतीं जलदांवरती अनंत संध्याराग पहा;
सर्व नभावर होय रेखिलें सुंदरतेचे रूप महा.

बलाकमाला उडतां भासे कल्पसुमांची माळचि ते,
उतरुनि येती अवनीवरतीं ग्रहगोलचि कीं एकमतें.

फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरें सावरिती, 
सुंदर हरिणी हिरव्या कुरणीं निज बाळांसह बागडती.

खिल्लारें हीं चरती रानीं, गोपहि गाणीं गात फिरे,
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरें.

सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला;
पारिजातही बघतां भामा-रोष मनीचा मावळला!

सुंदर परडी घेऊनी हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुलें-पत्री खुडती. 

देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयांत
वदनीं त्यांच्या वाचुनि घ्यावें श्रावण महिन्याचें गीत.

- बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)

(बालकवींच्या ‘आनंदी आनंद गडे’ या कवितेबद्दल वाचण्यासाठी इथं क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप


फोटो : अनिकेत कोनकर

 
15 3 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Geeta Deshpande About 1 Days ago
या नुसत्या कल्पनेनेच माझ्या मनात फुलपाखरं उडायला लागली
0
0
Sou Sunita patil About 13 Days ago
Very nice because all peoples always remember that type of poems will take happiness in their life
4
1
Samruddhi surve About 17 Days ago
खूप छान उपक्रम....मला सहभागी व्हायला आवडेल
6
3
Pranav About 17 Days ago
Va Kay Kavita Aahe Balkavi is great
7
2
Maheshwar Naik About 17 Days ago
Nice
3
4
Dr sachin powar About 18 Days ago
कविता वाचून बालपणीचा तो रम्य काळ आठवला.वर्गाबाहेर उनपावसाचा खेळ सुरू असताना वर्गात मोठ मोठाने या कवितिचे वाचन आम्ही मुले करायचो. बालपणीच्या त्या रम्य आठवणींचे स्मरण करून दिल्याबद्दल धन्यवाद
5
3
Ajitkumar Farande About 18 Days ago
I like this poem "Shravanmasi" very much.I have studied it.Every year I remember this poem in the month of Shravan.
3
4
ज्योती राणे About 23 Days ago
बालकवी माझे आवडते कवी.ही कविता मला खूप आवडते. आपल्या उपक्रमाचे स्वागत आहे
7
3
Om About 208 Days ago
Nice
4
3
Shoyeb Akhtar About 303 Days ago
I like it
4
4
Rajlaxmi pawar About
Very nice information
6
5
अरुण बोरसे About
मी एक शेतकरी , निसर्गाचा पुजारी, म्हणोनि आवडते, निसर्गाची बासरी
9
7

Select Language
Share Link
 
Search