Next
‘बॅंक ऑफ बडोदा’कडून कमी व्याजदरात कर्जपुरवठा
प्रेस रिलीज
Thursday, September 06 | 01:10 PM
15 0 0
Share this story

मुंबई : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या (एमएसएमइ) कर्जांबाबतची जोखीम कमी करण्याच्या उद्देशाने ‘बॅंक ऑफ बडोदा’ने एक विशेष योजना तयार केली आहे. ‘सिबिल एमएसएमइ रॅंक’ (सीएमआर) या श्रेणीत ज्या उद्योगांचे स्थान चांगले असेल, त्यांना कमी दराने कर्ज देण्याचे बॅंकेने ठरविले आहे. कर्ज घेऊ इच्छिणारी एमएसएमइ कंपनी पुढील १२ महिन्यांमध्ये ते कर्ज थकविण्याची शक्यता कितपत आहे, याचा अंदाज घेण्यासाठी या ‘सीएमआर’द्वारे ‘अल्गोरिदम’ यंत्रणेचा वापर केला जात आहे.

एमएसएमइ कंपन्यांचा यापूर्वीचा कर्जफेडीचा इतिहास सिबिलकडे असतो. ‘सिबिल एसएमएसइ रॅंक’मध्ये या कंपनीचे विशिष्ट स्थान असते. त्या स्थानावरून त्या कंपनीला कर्ज द्यायचे किंवा कसे हे बॅंकेला ठरविता येते. ‘सीएमआर-१’ या स्थानावरील कंपनीचा इतिहास चांगला असल्याचे व ‘सीएमआर-१०’ या स्थानावरील कंपनीचा इतिहास वाईट असल्याचे गृहीत धरण्यात येते. या ‘सीएमआर-१०’ स्थानावरील कंपनी कर्ज बुडविण्याची सर्वाधिक शक्यता असते. ‘सीएमआर’च्या आधारे कंपन्यांना कर्ज देताना त्यांच्या स्थानाप्रमाणे व्याजदर आकारण्याचे धोरण ‘बॅंक ऑफ बडोदा’ने आता आखले आहे. त्यायोगे ‘सीएमआर-१’ स्थानावरील कंपनीला सर्वात कमी व्याजदर आकारण्यात येणार आहे.

या धोरणाविषयी अधिक माहिती देताना ‘बॅंक ऑफ बडोदा’च्या कार्यकारी संचालिका पापिया सेनगुप्ता म्हणाल्या, ‘व्यवसाय वाढीसाठी व अधिकाधिक कर्ज वितरणासाठी नाविन्यपूर्ण व तंत्रज्ञानावर आधारीत संकल्पना आखण्याबाबत बॅंक ऑफ बडोदाचा नावलौकीक आहे. गृहकर्जांची जोखीम कमी करण्यासाठी त्यांच्यावर सिबिल स्कोअरवर आधारीत व्याजदर आकारण्याचे धोरण आखणारी बॅंक ऑफ बडोदा ही देशातील पहिलीच बॅंक ठरली होती. याचप्रकारे ‘सिबिल एमएसएमइ रॅंक’वर आधारीत व्याजदर आकारून या सूक्ष्म व लघु उद्योगांना कर्ज देण्याचे धोरण आखणारेही आम्हीच पहिले ठरणार आहोत.’

‘या धोरणानुसार सीएमआर श्रेणीत कमी आकडा असणाऱ्या उद्योगांना आम्ही एक वर्षासाठीच्या कर्जाचा व्याजदर अधिक ०.०५ टक्के इतका एकूण व्याजदर लावू. ‘सीएमआर’वर आधारीत व्याजदराच्या धोरणामुळे आम्हाला कर्जदार कंपन्यांच्या जोखमीविषयी चांगली कल्पना आलेली असेल व कमी जोखमीच्या कंपन्यांना आम्ही चांगली सेवा देऊ शकू,’ असे सेनगुप्ता यांनी सांगितले.

‘ट्रान्सयुनियन सिबिल – सिडबी’ यांच्या एमएसएमइ उद्योगाच्या कामगिरीविषयीच्या अहवालानुसार, भारतात सध्या व्यावसायिक कर्जांचा आकडा ५४.२ लाख कोटी रुपये इतका आहे, त्यात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना देण्यात आलेले कर्ज १२.६ लाख कोटी रुपयांचे आहे. याचा अर्थ लघु उद्योगांच्या कर्जांचे प्रमाण एकुणात २३ टक्के इतके आहे. ही आकडेवारी मार्च २०१८मधील आहे. एमएसएमइ क्षेत्राची वाढ दरवर्षी १६ टक्क्यांनी होत असल्याचेही दिसून आले आहे. ‘ट्रान्सयुनियन सिबिल’च्या व्यावसाय विभागाच्या विश्लेषणानुसार, ‘सीएमआर-६’ किंवा त्यापेक्षा चांगल्या स्तरातील आणि कमी व्याजदर लागू होण्यासाठी पात्र अशा सूक्ष्म व लघु उद्योगांची संख्या २१ लाख इतकी आहे.

एमएसएम कंपन्यांना अर्थसाह्य करताना त्यांच्यातील चांगल्या कंपन्यांची निवड करणे यास सध्या बॅंका व अर्थसंस्था प्राधान्य देत आहेत. या संदर्भात बॅंक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश पिल्लई म्हणाले, ‘एमएसएम कंपन्यांना जोखमीवर आधारीत व्याजदर आकारण्याचे बॅंक ऑफ बडोदाने टाकलेले पाऊल हे पुरोगामी स्वरूपाचे आहे. ‘सीएमआर’वर आधारीत व्याजदरामुळे जोखीम कमी होईलच, त्याशिवाय चांगल्या ग्राहकांची संख्या वाढेल. तसेच कर्जाची आवश्यकता असणाऱ्या व परतफेडीचा चांगला इतिहास असणाऱ्या कंपन्यांनाही यातून प्रोत्साहन मिळेल. त्यातून सर्वांचीच व्यवसायवृध्दी साधेल. ‘सीएमआर’मुळे विश्लेषित माहिती मिऴून त्यातून कर्जवितरणासंबंधी निर्णय घेणे सुलभ होत आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link