Next
गुहागर येथे फेरोसिमेंट तंत्रज्ञान कार्यशाळा
BOI
Friday, December 29, 2017 | 03:15 PM
15 0 0
Share this article:

फेरोसिमेंट तंत्रज्ञानाने टाकी बांधण्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देताना जलवर्धिनी प्रतिष्ठानचे उल्हास परांजपेगुहागर : ‘ग्रामीण भागातील स्थानिक गवंड्यांना फेरोसिमेंट तंत्राने टाकी बांधता यावी यासाठी संस्थेचा प्रयत्न असतो; मात्र शिक्षणाच्या माध्यमातून स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्यात जे विद्यार्थी प्रत्यक्ष काम करणार आहेत, त्या विद्यार्थ्यांना हे फेरोसिमेंट तंत्रज्ञान शिकता यावे व कमी खर्चात पाणी टंचाईसारख्या गंभीर विषयावर मात करण्याचे तंत्र अवगत व्हावे, यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे,’ अशी माहिती जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त उल्हास परांजपे यांनी दिली.

आंबव (देवरूख, ता. संगमेश्वर) येथील राजेंद्र माने तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांसाठी गुहागरातील वेळंब-बारगोडेवाडी येथील शेतकरी शरद बारगोडे यांच्या शेतावर फेरोसिमेंट तंत्राने टाकी बांधण्यासाठी निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठान ही संस्था गेली दोन वर्ष गुहागर तालुकयात ‘रेन वॉटर हॉर्वेस्टींग’वर काम करत आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर पावसाचे पाणी संकलन करण्याची टाकी बांधण्यासाठी गवंड्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच टाकीसाठी लागणारे साहित्यसुद्धा संस्थेच्या माध्यमातून पुरविण्याले जात आहे.

दोन वर्षांत आठ-नऊ गावांत अशा पद्धतीच्या पाऊस पाणी संकलित टाक्या बांधण्यात आल्या आहेत. गुहागर  तालुक्यात ही १६वी टाकी असून आतापर्यंत सुमारे २.२५ लाख लिटर पावसाचे पाणी साठवण्याची क्षमता या माध्यमातून निर्माण झाली आहे.

फेरोसिमेंट तंत्रज्ञानाने बांधण्यात आलेली टाकीया कार्यशाळेत ४० विद्यार्थी उपस्थित होते. टाकीचा पायवा, टाकीसाठी लागणाऱ्या सळ्या कापणे, चिकन मेश, वेल्ड मेशच्या माध्यमातून टाकीचा सापळा उभा करणे, सिमेंट-वाळूच्या मिश्रणाने ते लिंपणे व प्लॅस्टर करणे आदी बाबी विद्यार्थ्यांनी उत्सफूर्तपणे शिकून घेतल्या. ‘आम्हाला भविष्यात हे तंत्र ग्रामीण भागात काम करताना उपयोगी पडेल,’ अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

या वेळी परांजपे यांचे सहाय्यक विजय खरे, जलवर्धिनीचे येथील तालुका प्रतिनिधी व पाणी या विषयावर काम करणारे गजेंद्र पौनीकर, राजेंद्र माने तंत्रनिकेतनमधील प्राध्यापक राहुल बाबर, गणेश जाधव, दर्शना साळवी, पुणे येथील सेवावर्धिनी संस्थेच्या लता हिरेमठ, पालशेतचे महेश जोशी, श्री. बापट, ग्रामपंचायत सदस्य संदीप तांबे, जलवर्धिनीचे प्रशिक्षीत गवंडी जनार्दन भगत, विकास बारगोडे, शरद बारगोडे आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search