Next
कर्वे रस्ता ते वनाझ मार्गाची शिरोळेंकडून पाहणी
प्रेस रिलीज
Saturday, October 27, 2018 | 10:39 AM
15 0 0
Share this article:

अनिल शिरोळेपुणे : मेट्रोच्या कामामुळे अरुंद झालेला रस्ता आणि अनधिकृतपणे रस्त्यावरच लावली जाणारी वाहने यांमुळे कर्वे रस्ता ते वनाझ मार्गावर सध्या नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या भागात पादचाऱ्यांना चालण्यायोग्य पदपथांची कमतरता असल्यामुळे त्यांची मोठी अडचण होत आहे. नागरिकांचे हे प्रश्न लक्षात घेऊन त्यावर उपाय शोधण्यासाठी खासदार अनिल शिरोळे यांनी पालिका, महामेट्रो आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांसोबत नुकतीच या भागाची पाहणी केली.

पालिकेच्या रस्ते विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, पोलीस उपायुक्त (वाहतूक) तेजस्वी सातपुते, ‘महामेट्रो’चे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रह्मण्यम, ‘पेडस्ट्रियन्स फर्स्ट’ या संस्थेचे प्रतिनिधी प्रशांत इनामदार यांच्यासह शिरोळे यांनी कर्वे रस्ता ते वनाझ मार्गाची पाहणी करून वाहतूक समस्या तसेच पादचाऱ्यांची गैरसोय कशी टाळता येईल याविषयी चर्चा केली. या मार्गावरील पदपथांवर असलेले अडथळे दूर करून पदपथ पादचाऱ्यांना वापरण्यायोग्य केले जातील, अशी चर्चा या वेळी झाली.

‘पेडस्ट्रियन्स फर्स्ट’चे इनामदार यांनी शिरोळे यांना पादचाऱ्यांच्या समस्यांबाबत काही सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने या पाहणीत अवलोकन करण्यात आले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search