Next
‘झोराष्ट्रियन’ इतिहास सांगणारे चित्रप्रदर्शन
BOI
Saturday, February 09, 2019 | 04:25 PM
15 0 0
Share this article:

पुणे : पारशी समाजाचा इतिहास, भारतातील झोराष्ट्रियन, त्यांची संस्कृती, जीवनपट व धर्म या बाबींशी निगडित अशोक कुमार यांच्या चित्रांचे प्रदर्शन येथील ‘राजा रविवर्मा आर्ट गॅलरी’त भरवण्यात आले आहे. आठ ते १० फेब्रुवारी, सकाळी १० ते संध्याकाळी सात या वेळेत ते सर्वांसाठी खुले आहे. 

कामगारांच्या जिव्हाळ्यापोटी फार वर्षांपूर्वी हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यामधून भारतातील पारशी समाजाचे मूळ मांडण्यात आले होते. ‘झोराष्ट्रियन’ हे इरान देशाच्या साम्राज्याचे व पारशी धर्माचे जनक आहेत. या चित्रकलेच्या व त्यांच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्राचीन, जुन्या संस्कृतीचे, समाजाचे दृष्यमान जागृत ठेवण्याचे कार्य केले जात आहे. 

या प्रदर्शनामध्ये जवळपास ४५ चित्र असून या प्रदर्शनातून दर्शकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच समाजाविषयीचे तत्वज्ञान, संस्कृती व प्राचीन झोराष्ट्रियन यांच्यावरील दृढ विश्वासास पुष्टी देणे या उद्देशाने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे, असे कुमार यांनी सांगितले आहे. 

हे चित्रकला प्रदर्शन हे भारतातील वेगवेगळ्या शहरांत भरवले जाणार असून, झोराष्ट्रियन यांच्या कार्याची जाणीव करून देण्यासाठी ते महत्त्वाचे ठरणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search