Next
‘शिवजातस्य’ फॅशन शोमधून शिवकालीन संस्कृतीचे दर्शन
BOI
Wednesday, February 20, 2019 | 05:47 PM
15 0 0
Share this story


पुणे : शिवजयंतीचे औचित्य साधून महाफॅशन फाउंडेशन आणि तष्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवजातस्य’ या अनोख्या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. बाणेरमधील वृंदावन लॉन्स येथे झालेल्या या फॅशन शोमध्ये शिवाजी महाराजांच्या काळातील पोशाख, अलंकार, पगडी आदी प्रकार सादर करण्यात आले. शिवकालीन संस्कृतीबरोबरच या वेळी पेशवाई आणि मुघल साम्राज्यातील पेहेरावही सादर करण्यात आले.

या वेळी तष्टचे दिपक माने म्हणाले, ‘आतापर्यंत फॅशन शोच्या माध्यमातून अनेक संकल्पनांवर आधारित विविध प्रांतांच्या पोशाखांचे सादरीकरण करण्यात आले आहे; परंतु शिवकालीन साम्राज्यातील पेहेराव पहिल्यांदाच दाखवण्यात आले.’


या अनोख्या फॅशन शोची संकल्पना महाफॅशन फाउंडेशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत गुंड यांची होती. फॅशन शोचे दिग्दर्शन प्रख्यात फॅशन शो कोरिओग्राफर सत्यजित जोगळेकर यांनी केले होते. निवेदन अमोल मोरे यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link