Next
स्टॉक ब्रोकिंग सुरू करण्यासाठी ‘पेटीएम मनी’ला ‘सेबी’ची मंजुरी
प्रेस रिलीज
Friday, April 05, 2019 | 02:25 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘पेटीएम मनी’ला आपल्या वापरकर्त्यांना स्टॉक ब्रोकिंग सेवा प्रदान करण्यासाठी सिक्योरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाची (सेबी) मंजुरी मिळाल्याचे ‘पेटीएम मनी’ने जाहीर केले. ‘पेटीएम मनी’च्या सदस्यत्वाला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजकडून (एनएसई) मंजुरी मिळाली आहे.

आपल्या अॅपमार्फत नवीन उत्पादने आणि इक्विटीज, डेरिव्हेटिव्ज, करन्सी, कमोडिटी, ‘ईटीएफ’मध्ये गुंतवणूक आणि ट्रेडिंग आणि इतर इक्स्चेंज ट्रेडेड उत्पादने यांसारखी ऑफरिंग्ज प्रस्तुत करण्याची त्यांची योजना आहे.

‘पेटीएम मनी’चे पूर्णवेळ संचालक प्रवीण जाधव म्हणाले, ‘या मंजुरीमुळे, एक परिपूर्ण संपत्ती व्यवस्थापन मंच होण्याच्या आपल्या लक्ष्याच्या दिशेने ‘पेटीएम मनी’ने आणखी एक पाऊल उचलले आहे. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणे सुलभ आणि सहज उपलब्ध करून देणे हे लक्षावधी भारतीयांपर्यंत पैसे कमावण्याची संधी पोहोचविण्याच्या आमच्या मिशनला अनुरूप आहे. काही महिन्यातच आम्ही लाइव्ह होणार आहोत व त्यावेळी आम्ही आमच्या वापरकर्त्यांना सर्व एक्स्चेंज ट्रेडेड उत्पादने ऑफर करू शकू.’

स्टॉक ट्रेडिंग सेवा सक्रिय झाल्यावर कंपनी उत्पादने, ऑफरिंग्ज, फीचर्स, प्रायसिंगबाबत अधिक अपडेट्स आणि इतर तपशील जाहीर करेल. सादर झाल्यापासून अवघ्या काही महिन्यांत ‘पेटीएम मनी’चे एक दशलक्षपेक्षा जास्त वापरकर्ते झाले आहेत, ज्यामुळे भारतात म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा तो सर्वात मोठा मंच ठरला आहे, जो थेट म्युच्युअल फंडमध्ये कमिशन मुक्त गुंतवणूक ऑफर करतो.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search