Next
वीणा, एव्हा मारी सेंट, नीना गुप्ता
BOI
Wednesday, July 04, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘मोनालिसा’ असं जिला सौंदर्याबद्दल म्हटलं गेलं ती अभिनेत्री वीणा, हॉलिवूड अभिनेत्री एव्हा मारी सेंट आणि टीव्ही सीरियल्स आणि हिंदी सिनेमांत छाप पाडलेली अभिनेत्री नीना गुप्ता यांचा चार जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
....... 
वीणा

चार जुलै १९२६ रोजी पाकिस्तानातील क्वेट्टा येथे जन्मलेली तेजौर सुलताना ऊर्फ वीणाकुमारी ऊर्फ वीणा ही अत्यंत सुंदर चेहऱ्याची करारी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होती. १९४२ ते १९८३ अशी चाळीस वर्षं हिंदी चित्रपटसृष्टीत कामं करून तिनं आपला ठसा उमटवला होता. तिच्या उमेदीच्या काळात ती ‘मोनालिसा’ म्हणून ओळखली जायची! ती पडद्यावर असली, की त्या फ्रेममधले बाकीचे कलाकार तिच्यासमोर फिके पडायचे. ‘हलाकू’मधली महाराणी, ‘ताजमहाल’मधली नूरजहान आणि ‘पाकिजा’मधली नवाबजान या तिच्या अविस्मरणीय भूमिका ठरल्या. तिच्या सौंदर्यात तिची करारी नजर उठून दिसायची आणि छाप पाडून जायची. नजमा, हुमायून, दास्तान, अफसाना, चलती का नाम गाडी, कागज के फूल, छोटीसी मुलाकात, फिर वोही दिल लाया हूँ, सिकंदर ए आझम, परिचय, आशीर्वाद, प्राण जाए पर वचन न जाए, शतरंज के खिलाडी, रझिया सुलतान, अशा गाजलेल्या सिनेमांत तिने आपल्या अदाकारीची दखल घ्यायला लावली होती.
.......

एव्हा मारी सेंट 

चार जुलै १९२४ रोजी न्यू जर्सीमध्ये जन्मलेली एव्हा मारी सेंट ही अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होती. सुरुवातीला टेलिव्हिजनसाठी कामं करून पुढे तिने तब्बल ७० वर्षं हॉलिवूडमध्ये काम केलं. एलिया कझानच्या ‘ऑन द वॉटर फ्रंट’मध्ये मार्लन ब्रांडोबरोबर चमकताना तिने पदार्पणातच सहायक भूमिकेचं ऑस्कर पटकावलं होतं. पुढे हिचकॉकच्या ‘नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट’मध्ये ती कॅरी ग्रांटबरोबर चमकली. तो सिनेमा तुफान गाजला होता. ‘ए हॅटफुल ऑफ रेन’ सिनेमासाठी तिला गोल्डन ग्लोब नामांकन मिळालं होतं. एक्झोडस, दी सँडपायपर, दी रशियन्स आर कमिंग! दी रशियन्स आर कमिंग!, ग्रांड प्री, टॅक्सी, आय ड्रीम्ड ऑफ आफ्रिका, असे तिचे चित्रपट गाजले आहेत. 
.......

नीना गुप्ता 

चार जुलै १९५९ रोजी दिल्लीमध्ये जन्मलेली नीना गुप्ता ही समर्थ अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. तिला १९९४ सालचा सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. श्याम बेनेगल, गिरीश कार्नाड यांसारख्या दिग्दर्शकांच्या फिल्म्समधून ती चमकली. ये नजदीकियाँ, साथ साथ, मंडी, जाने भी दो यारों, त्रिकाल, दृष्टी, उत्सव, यात्रा, रिहाई, डॅडी, खलनायक, असे गाजलेले हिंदी सिनेमे करत असताना तिने गांधी, दी डीसिव्हर्स, इन कस्टडी, कॉटन मेरी यांसारख्या इंग्लिश सिनेमांतूनही कामं केली. अनेक वर्षं ती अनेक प्रमुख टीव्ही सीरियल्समधेही झळकली होती. 

यांचाही आज जन्मदिन :

नॅथिनील हॉथॉर्न आणि नारायण केशव बेहेरे (त्यांच्याविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link