Next
‘बजाज अलियान्झ लाईफ’कडून कमी हप्त्यामध्ये आयुर्विमा
प्रेस रिलीज
Friday, August 31, 2018 | 05:33 PM
15 0 0
Share this article:

पुणे : बजाज अलायन्झ लाईफ इन्शुरन्स कंपनीने कमीत कमी हप्ता भरून आयुर्विम्याचे छत्र देणारी ‘पॉईंट ऑफ सेल (पीओएस) गोल सुरक्षा’ नावाची पॉलिसी सादर केली  आहे. यामध्ये दरमहा चारशे पन्नास रुपये इतक्या कमी हप्त्यात आयुर्विमा घेता येणार असून, ग्राहकांना वैद्यकीय चाचण्या करण्याचीही गरज नाही. 

या पॉलिसीबाबत अधिक माहिती देताना ‘बजाज अलियान्झ लाईफ इन्शुरन्स कंपनी’चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ तरुण चुघ म्हणाले, ‘विमा पॉलिसी या सहजसोप्या व जलद वितरीत होण्याजोग्या असाव्यात, असे एक मार्गदर्शक तत्व ‘इर्डा’ या विमा नियामक संस्थेने घालून दिले आहे. प्रत्येक भारतीयाला विम्याचे लाभ पोहोचविण्याच्या आमच्या व्यावसायिक प्रवासात या मार्गदर्शक तत्वाची मोलाची मदत होत आहे. त्यानुसार ‘पीओएस गोल सुरक्षा’ ही अतिशय स्वस्त हप्ता असलेली, सोपी आणि मूल्याधिष्ठित पॉलिसी तयार करण्यात आली आहे. या पॉलिसीत ग्राहकाला निश्चित स्वरुपाचे लाभ मिळण्याची हमी आहे. कमी प्रीमिअम भरून चांगल्या सुविधा हव्या असणाऱ्या ग्राहकांसाठी ही आयुर्विमा पॉलिसी आदर्श ठरणार आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘या पॉलिसीचे सर्व हप्ते भरून तिची मुदत संपल्यावर, विम्याची संपूर्ण रक्कम व आणखी काही विशेष लाभ देण्यात येतात. पॉलिसीची मुदत दहा वर्षांची आहे, तर हप्ते सात वर्षे भरावयाचे आहेत. या पॉलिसीवर कर्जही मिळू शकते, तसेच हप्ते भरण्याची पध्दत बदलता येऊ शकते. उदाहरणार्थ, सुभाष या ४० वर्षे वयाच्या व्यक्तीने ‘बजाज अलियान्झ लाईफ पीओएस गोल सुरक्षा’ ही पॉलिसी वार्षिक पाच हजार रुपये हप्त्यावर घेतली. त्याच्या पॉलिसीची मुदत दहा वर्षे आहे आणि हप्ता भरण्याची मुदत सात वर्षांची आहे. या सात वर्षांत तो एकूण ३५ हजार रुपये इतका हप्ता भरेल. त्याच्या विम्याचे छत्र ५० हजार रुपयांचे असेल. दहा वर्षांची मुदत संपल्यावर, निश्चित स्वरुपाचे अतिरिक्त लाभ मिळून, सुभाषला ५० हजार ७५० रुपये मिळतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search