Next
अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग आठ
BOI
Tuesday, July 16, 2019 | 12:15 PM
15 0 0
Share this article:

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. ते ऑडिओ बुकगंगा वेबसाइटवरून मोफत ऐकता येणार आहे. या ध्वनिनाट्याचा आठवा भाग आता प्रसिद्ध झाला असून, त्यात काय ऐकता येईल, त्याबद्दलची ही माहिती...
............
अंदमानातील नरकयातना शब्दातीत होत्या. भारतीय कैद्यांना एखाद्या बैलासारखे घाण्याला जुंपून, कोलूला लावून तेल काढण्याचे, नारळ सोलून काथ्याकूट करण्याचे, दिवसभर दंडाबेदी घातलेल्या अवस्थेत हात वर बांधून काठ्या आणि चाबकाचे फटके मारून, अर्ध्या कच्च्या जेवणात नको नको ते कृमी-कीटक घालून सावरकरांसहित सर्व कैद्यांचे मानसिक आणि शारीरिक खच्चीकरण करण्याचे अनेक प्रयत्न सतत करण्यात आले; मात्र या सर्व हालअपेष्टा सोसत असतानाही, सावरकरांनी हिंदी, बंगालीबरोबरच उर्दू भाषेवर प्रभुत्व संपादन केले आणि त्यांच्यातील महाकवीचे स्फुल्लिंग तिथेही तेजाळले. सप्तर्षी, गोमंतक, कमला यांसारखी शृंगाररसपूर्ण महाकाव्ये असोत, वा देशभक्तीच्या गज़ला असोत... सावरकरांनी ही सर्व शब्दसंपदा तुरुंगाच्या भिंतींवर खिळे/काटे या वस्तूंच्या साह्याने रेखाटली आणि पूर्ण तोंडपाठ करून ठेवली. बरोबरच्या कैद्यांना एकत्र करून, त्यांचे मनोधैर्य वाढवून, गुप्तपणे निरोप देता यावेत यासाठी सावरकरांनी एक सांकेतिक ध्वनीलिपी वापरात आणली. अशी दहा खडतर वर्षे लोटल्यानंतर, दोन मे १९२१ रोजी राजबंद्यांच्या मुक्तता धोरणानुसार सावरकरांची अंदमानातून सुटका झाली; मात्र पुढील तीन वर्षे पुण्याला येरवडा कारागृहात आणि पुढे १९३७ सालापर्यंत रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध राहण्याच्या बंधनावर त्यांची सुटका करण्यात आली.

लेखक/दिग्दर्शक : माधव खाडिलकर
संगीत : आशा खाडिलकर
निर्मिती : ओंकार खाडिलकर
सहनिर्माते : रिव्हर्ब प्रोडक्शन्स
संगीत संयोजन : आदित्य ओक
ध्वनिसंयोजन : मंदार कमलापूरकर
डिजिटल पार्टनर : स्मृतिगंध
सौजन्य : उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट

(ध्वनिनाट्याचा आठवा भाग ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. ध्वनिनाट्याच्या पहिल्या सातही भागांच्या लिंक्सही खाली दिल्या आहेत. या ध्वनिनाट्याचा नववा भाग २३ जुलै २०१९ रोजी प्रसारित होणार आहे. या नाटकाची आणि ध्वनिनाट्याची निर्मितीकथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search