Next
‘विश्वसम्राट बळीराजाचे पूजन व स्मरण करणे कर्तव्य’
प्रेस रिलीज
Monday, November 12, 2018 | 03:22 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘बहुजन समाजाच्या दृष्टीने दिवाळीतील सर्वांत मंगलमय, स्फूर्तीदायक, सर्वांत महत्त्वाचा व आनंदाचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदेचा हे आम्ही आज अभिमानाने सांगतो. विश्वसम्राट बळीराजा हा आपला राजा असून, त्याचे पूजन व स्मरण करणे आपले कर्तव्य आहे,’ असे प्रतिपादन विचारवंत प्रा. प्रतिमा परदेशी यांनी केले.

शिवस्फूर्ती प्रतिष्ठानतर्फे दिवाळी प्रबोधन पहाट कार्यक्रमात ‘बळीराजा महोत्सव…’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे झाला. या कार्यक्रमाचे यंदाचे हे सलग सहावे वर्ष होते. या प्रसंगी शिवस्पर्श रौप्यमहोत्सवी दिवाळी अंकाचे, तसेच पी. टी. पाटील लिखित राजर्षी शाहू महाराज चरित्र काव्य व विनय मिरासे लिखित ‘आता उठवू सारे रान..!’ या वैचारिक लेखसंग्रहाचे प्रकाशन प्रा. परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.प्रा. परदेशी म्हणाल्या, ‘बळीराजाची महती ही सत्यशोधक विचारांनी पटवून दिली. इतिहासकडे कसे बघायचे हे महात्मा फुलेंनी सांगितले. दिवाळी व दसरा हे सण बहुजन समाजातील महत्त्वाचे दिवस आहेत.’

या वेळी पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अंकल सोनावणे व भाऊ मडके यांना ‘चळवळीतील अवलिया’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. या प्रसंगी विचारपीठावर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ॲड. शैलजा मोळक, विनय मिरासे, कॉ. मोहन देशमुख, पंकज पासलकर, विजय टिळेकर हे उपस्थित होते.

जनता वसाहतमधे काही दिवसांपूर्वी कालवा फुटून झालेल्या दुर्घटनेतील पिडीत हमालकाम करणाऱ्या शीतल शितापुरे व रद्दी विकणाऱ्या भारती भोसले या दोन कुटुंबांना बारवकर कुटुंबाकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. या वेळी लेखक विनय मिरासे व शिवस्पर्श प्रकाशनच्या संपादक ॲड. मोळक यांनी मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी शाहीर कॉ. मोहन देशमुख यांचा ‘लोकजागर- गाणी श्रमिकांची’ हा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम झाला. शाहीर वामनदादा कर्डक व शाहीर अमर शेख यांचे पोवाडे व गाणी गाऊन भारुडसुद्धा सादर झाले. कॉ. मोहन देशमुख यांचे हे कलापथक खास संगमनेरहून पुण्यात आले होते. कष्टकरी, शेतकरी व कामगार वर्गाची गाणी यात झाली. भाजीपाला, धान्य व बळीराजाचे पूजन करून हा दिवस साजरा झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सचिव प्रज्ञेश मोळक यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search