Next
ज्ञानप्रबोधिनीतील संगणक कक्षाचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Monday, March 12 | 12:45 PM
15 0 0
Share this story

डॉ. अरुण निगवेकर, प्राचार्य मिलिंद नाईक, कार्यवाह सुभाष देशपांडे, विवेक पोंक्षे आणि निगवेकर कुटुंबिय

पुणे : ‘तंत्रज्ञान मोठ्या वेगाने बदलत असून, एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांना बाविसाव्या शतकासाठी सज्ज करण्याची जबाबदारी शिक्षण क्षेत्रावर आली आहे. ‘ज्ञान प्रबोधिनी’सारख्या संस्थांनी ही जबाबदारी स्वीकारून, विद्यार्थ्यांना पुढील मार्ग दाखवावा,’ असे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांनी केले. 

ज्ञान प्रबोधिनी प्रशालेला अद्ययावत संगणक कक्ष उभारण्यासाठी डॉ. अरुण निगवेकर यांनी चार लाख रुपये देणगी दिली होती. डॉ. अरुण निगवेकर यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या संगणक कक्षाचे उद्घाटन दहा मार्च २०१८ रोजी झाले. सौ. हेमा निगवेकर, ज्ञान प्रबोधिनीचे कार्यवाह सुभाष देशपांडे, शैक्षणिक विभागाचे कार्यवाह विवेक पोंक्षे, प्राचार्य मिलिंद नाईक तसेच, निगवेकर कुटुंबिय उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

डॉ. अरुण निगवेकरया वेळी बोलताना डॉ. निगवेकर म्हणाले, ‘शिक्षण ही सोन्यासारखी संधी आहे. विद्यार्थ्यांनी ती योग्य तऱ्हेने वापरली पाहिजे. शिक्षणातील संधींचा वापर करून नवे काही करता येईल का, याचा विचार केला पाहिजे. ज्ञान प्रबोधिनी ही शिक्षण क्षेत्रातली वेगळी प्रशाला म्हणून भारतात आणि भारताबाहेर ओळखली जाते. सामाजिक बांधिलकी असलेली संस्था, झोकून देण्याची वृत्ती असलेल्यांची संस्था असा तिचा लौकिक आहे. म्हणून ज्ञान प्रबोधिनीने पुढील मार्ग दाखवावा आणि विद्यार्थ्यांनीदेखील शाळेला पुढे नेण्याची संधी घ्यावी.’ 

प्रशालेच्या ‘वार्षिक वैज्ञानिक प्रकल्प स्पर्धे’तील विजेत्या विद्यार्थ्यांना डॉ. निगवेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पुढील संगणक प्रकल्पासाठी आणखी १४ लाख रुपये देणगी देण्याची घोषणा, या वेळी डॉ. अरुण निगवेकर यांनी केली. 

प्राचार्य डॉ.  मिलिंद नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजल अक्कलकोटकर यांनी केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link