Next
साई मंदिर प्रतिनिधींचे संमेलन २३ डिसेंबरला
प्रेस रिलीज
Monday, November 13 | 03:03 PM
15 0 0
Share this story

शिर्डी : ‘श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्थेतर्फे श्री साईबाबा समाधी शताब्‍दी महोत्‍सव वर्षाच्‍या नियोजनासाठी देशातील व परदेशातील साई मंदिरातील प्रतिनिधींचे संमेलन २३ डिसेंबरला होणार आहे,’ अशी माहिती संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे दिली.

डॉ. हावरे म्‍हणाले, ‘श्री साईबाबांच्‍या समाधीचा शताब्‍दी सोहळा एक ऑक्‍टोंबर २०१७ ते १८ ऑक्‍टोंबर २०१८ या कालावधीत साजरा करण्‍यात येणार आहे. त्यानिमित्ताने वर्षभर धार्मिक, सांस्‍कृतिक, सामाजिक, प्रबोधनात्‍मक व पादुका दर्शन सोहळा आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांच्‍या नियोजनात सर्व साई मंदिर प्रतिनिधींचा सहभाग असावा यासाठी जागतिक साई मंदिर विश्‍वस्‍त परिषदेचे आयोजन केले आहे.’

‘संमेलनात सहभागी होण्‍यासाठी देशातील व परदेशातील सर्व साई मंदिरांच्‍या दोन प्रतिनिधींनी साई मंदिराचा पत्‍ता, मोबाईल क्रमांक व ई-मेल आदी माहिती संस्‍थानचे अधि‍कृत संकेतस्‍थळ sai.org.in यावरील नोंदणी फॅार्मप्रमाणे तातडीने भरावी,’ असे आवाहन डॉ. हावरे यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link