Next
महाराष्ट्रातील युवा जलतरणपटू प्रभात कोळीला तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार
BOI
Wednesday, August 28, 2019 | 12:58 PM
15 0 0
Share this article:

प्रभात कोळीनवी दिल्ली : महाराष्ट्रातील युवा जलतरणपटू प्रभात कोळी याला मानाचा तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार जाहीर झाला आहे. गुरुवार, दि. २९ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने २०१८साठीच्या तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारासाठी साहसी क्रीडाप्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या देशातील सहा खेळाडूंची निवड झाली असून, प्रभात कोळी याच्या सागरी जलतरणातील साहसाची नोंद घेऊन त्याला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

नवी मुंबई येथील नेरूळ भागात राहणाऱ्या १९ वर्षांच्या प्रभातने नुकताच दक्षिण आफ्रिकेतील केपटाउनचा आठ किलोमीटरचा समुद्र पार केला आणि जगातील मान्यता प्राप्त आठवा समुद्रकिनारा पार करण्याचा विक्रमही नोंदवला. न्यूझीलंडमधील कूक स्ट्रीट, इंग्लीश खाडी, कॅटलिना, कैवी, सुगारू, नॉर्थ चॅनल आणि जिब्राल्टरची सामुद्रधुनी असे एकूण सात खडतर टप्पे प्रभातने यापूर्वी पूर्ण केले आहेत. त्यातील काही टप्प्यांमध्ये सर्वांत तरुण खेळाडू म्हणून त्याच्या नावाची नोंद झाली आहे.

प्रभात हा कोळी कुटुंबातला, त्यामुळे समुद्राशी त्याचे घट्ट नाते आहे. वडील राजू कोळी मासेमारी व्यवसायात आहेत. प्रभातने २०१२मध्ये  ‘धरमतर ते गेटवे’ हे सर्व नव्या सागरी जलतरणपटूंचे प्राथमिक आव्हान पार केले. वयाच्या १४व्या वर्षीच ‘कासा ते खांदेरी’ हा धोकादायक मानला जाणारा सागरी पट्टा पार करून त्याने आपल्यातील साहसी जलतरणपटूची चुणूक जगाला दाखवून दिली होती. वडील राजू आणि आई शिल्पा कोळी यांनी घर विकून प्रभातच्या सागरी जलतरणावर लक्ष केंद्रित केले. त्याला या क्षेत्रात पुढे जाण्यास प्रोत्साहन दिले.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search