Next
किंग्सले एमिस
BOI
Monday, April 16, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

गेल्या शतकाच्या उत्तरार्धातला श्रेष्ठ विनोदी ब्रिटिश लेखक असा ज्याचा गौरव होतो, त्या किंग्सले एमिसचा १६ एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...
......
१६ एप्रिल १९२२ रोजी लंडनमध्ये जन्मलेला किंग्सले एमिस हा विनोदी कादंबरीकार, कवी, निबंधकार म्हणून प्रसिद्ध होता. 

‘लकी जिम’ ही त्याची कादंबरी ५०च्या दशकातली ब्रिटनमधली अत्यंत लोकप्रिय कादंबरी मानली जाते. मध्यमवर्गाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जिम डिक्सन या अँग्री यंग मॅनची त्या वेळच्या समाजव्यवस्थेविरुद्धची खदखद लोकांना भावली होती. 

‘दॅट अनसर्टन फिलिंग’, ‘आय लाइक इट हिअर’ आणि ‘वन फॅट इंग्लिशमन’ या त्याच्या पुढच्या कादंबऱ्यासुद्धा लोकप्रिय झाल्या होत्या. 

टेक ए गर्ल लाइक यू, दी अँटी डेथ लीग, आय वाँट इट नाऊ, दी ग्रीन मॅन, दी ओल्ड डेव्हिल्स, अशांसारख्या त्याच्या चाळीसेक कादंबऱ्या प्रसिद्ध होत्या. ‘हेमिंग्वे इन स्पेस’ ही त्याची पंच मासिकातली कथाही लोकांना आवडली होती. 

गेल्या शतकाच्या उत्तरार्धातला एक श्रेष्ठ विनोदी लेखक असा त्याचा गौरव केला गेला. 

२२ ऑक्टोबर १९९५ रोजी लंडनमध्येच त्याचा मृत्यू झाला. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link