Next
अल्पसंख्याक विभाग तालुकाध्यक्षपदी फेरोज खुरेशी
नागेश शिंदे
Wednesday, March 06, 2019 | 12:12 PM
15 0 0
Share this article:

हिमायतनगर : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित असलेले फेरोज खुरेशी यांची जिल्हाध्यक्ष अ.शमीम अब्दूलासाब यांनी हिमायतनगर अल्पसंख्याक विभागाच्या तालुकाध्यक्षपदी निवड केली.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व माजी आमदार माधवराव यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर तालुका अल्पसंख्याक विभागाचे काम करण्याची जबाबदारी खुरेशी यांना देण्यात आली आहे. काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर यांच्या हस्ते हिमायतनगर अल्पसंख्याक तालुकाध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र खुरेशी यांना देण्यात आले.

फेरोज खुरेशीया प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक गणेश शिंदे, डॉ. प्रकाश वानखेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक सेठ, माजी नगराध्यक्ष अ.अखिल, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष विकास पाटील, संजय माने, परमेश्वर गोपातवाड आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी खुरेशी यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search