Next
तणाव प्रबंधन
BOI
Wednesday, March 20, 2019 | 10:42 AM
15 0 0
Share this article:

स्पर्धेच्या जीवनात ताण येणे, ही बाब सहज घेतली जाते; पण ताण म्हणजे नेमके काय, हे सांगताना ‘परिस्थितीशी जुळवून घेताना येणाऱ्या अडचणी म्हणजे ताण,’ अशी व्याख्या प्रा. डॉ. मनीषा मुलकलवार यांनी ‘तणाव प्रबंधन’मधून केली आहे. तणावाचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य कसे विकसित करायचे, याचे मार्गदर्शन या पुस्तकातून केले आहे.

तणावाची संकल्पना, प्रकार, तणावग्रस्त व्यक्तींची लक्षणे, तणावाबाबत गैरसमज, भारतातील परिस्थिती, तणावकारक घटक, त्याचे वर्गीकरण, तणावाची कारणे, तणावाने शरीरामध्ये होणारे बदल, तणाव व मन, तणाव व भावना, तणाव व आजार, याबाबतही सविस्तर माहिती दिली आहे. तणाव प्रबंधन संकल्पना, त्यातील अडथळे, तणाव प्रबंधातील पायऱ्या, सूचना, त्यासाठी दशसूत्री सांगितले आहे.

तणाव प्रबंधानात्मक जीवनशैलीसाठी जगताना सकारात्मक दृष्टीकोन, नातेसंबंधातील, स्वास्थ यांचे महत्त्व, आहार-व्यायामाची कशी गरज भासते, हे स्पष्ट केले आहे. पुस्तकातील प्रत्येक मुद्दा सोप्या भाषेत समजावून देताना उदाहरणांचा वापरही केला आहे.           

पुस्तक : तणाव प्रबंधन
लेखक : डॉ. मनीषा मुलकलवार
प्रकाशक : शब्दयात्रा प्रकाशन
पाने : १९०
किंमत : २४० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search